गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

ललित गद्याचा अलौकिक आविष्कार

मराठीतील ललित गद्य या साहित्यप्रकारात स्वत:ची निजखूण उजळ करणाऱ्या लेखकांमध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव अग्रस्थानी आहे. आत्मनिष्ठता हे या लेखनप्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अंतर्मुख होऊन जगण्याचा तळ गाठणारे चिंतनगर्भ लेखन करणे सहजसाध्य नाही. प्रयासाने लेखनकौशल्य प्राप्त करून भाषिक सामर्थ्यावर तडीला नेता येईल असा हा वाङ्मयप्रकार नाही. आत्मचिंतनातून निर्माण होणाऱ्या अनाहत नादाला साक्षीभावाने ओळखून त्याच्या [...]