मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. वेगवेगळ्या बोलीभाषांमधले, वर्गांमधले लेखक वेगवेगळे आशय-विषय घेऊन कथालेखन करत आहेत. परंतु अजूनही मराठी वाचक, आस्वादक नवकथेच्या पुढे पाऊल टाकू शकलेला नाही. म्हणूनच गेल्या वीस वर्षांत लिहिल्या गेलेल्या कथांवर काहीएक चर्चा व्हावी, असा विचार करून आम्ही नीतीन रिंढे, दीपा देशमुख आणि किरण येले या तीन मान्यवर लेखकांना, गेल्या वीस वर्षांतल्या त्यांना आवडलेल्या कथांवर लेख लिहायला सांगितलं. हे लेख एक किंवा मोजक्या काही कथांवर असले, तरी वाचकांना दिशादर्शन व्हावं यासाठी त्यांना आवडलेल्या इतर कथांची यादीदेखील द्यायला सांगितलं. त्यातला लेखिका व उत्तम वाचक दीपा देशमुख यांचा लेख…

निवडलेली कथा : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी
(लेखक- बालाजी सुतार.)

लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे सगळे साहित्यप्रकार वाचताना त्या-त्या प्रकारांची वैशिष्ट्यं, त्यांच्यातलं सौंदर्य, त्यांच्यातली बलस्थानं तर लक्षात येतात आणि वाचक आपापल्या पिंडाप्रमाणे एका विशिष्ट प्रकाराकडे जास्त खेचला जातो. मला स्वत:ला कथा हा प्रकार आवडतो, याचं कारण तो नेमका आणि सुटसुटीत असून तो वाचकाच्या सगळ्या अपेक्षाही पूर्ण करतो.
ज्या वेळी रोहन प्रकाशनकडून मला आवडलेल्या कथेबद्दल लिहिण्याचा प्रस्ताव आला, त्या वेळी यात काय विशेष, आपण सहज एखादी आपल्याला आवडलेली कथा घेऊन त्यावर लिहू असं मला वाटलं. पण त्याच वेळी, गेल्या २० वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कथेवरच लिहायचं आहे असं सांगण्यात आलं तेव्हा मी विचारात पडले. चटकन डोळ्यांसमोर मनाला भिडलेली एकही कथा आठवेना. ज्या कथा आठवत होत्या, त्या सगळ्या अनुवादित होत्या. इथे तर अनुवादित कथा नको होती, अस्सल बाजाची कथा हवी होती. आणि मग लख्ख वीज चमकून जावी, तशी एक कथा डोळ्यांसमोर आली आणि माझा शोध तिने थांबवला. तुला हवं ते सगळं माझ्यात आहे असं तिने समोर येऊन सांगितलं. खरंच होतं ते… मला जे जे हवं ते या कथेत सापडलं. कथा आहे – ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ आणि लेखक – बालाजी सुतार.
बालाती सुतार हा नव्या दमाचा, नव्या ताकदीचा आणि आसपासचं वास्तव वेगळ्या शैलीत मांडणारा तरुण लेखक. राजन गवस यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘उद्या कथासाहित्याचा इतिहास लिहिताना बालाजी सुतार या लेखकाला वगळून पुढे जाताच येणार नाही.’ नुकतंच बालाजी सुतार यांना ‘बी. रघुनाथ’ पुरस्काराने गौरवलं गेलं, त्या वेळी “सरलेले शतक आणि चालू शतक यांच्या सांध्यावरचा हा अस्वस्थ करणारा कालखंड आहे. या काळाला शब्दबद्ध करण्याचा लेखक म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतो,” असे उद्गगार त्याने काढले होते. एक संवेदनशील लेखक आणि एक जिज्ञासू वाचक, विचारवंत; इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, जागतिक सिनेमा, संगीत, साहित्य, नाटक, कविता या सगळ्या क्षेत्रांचं बारकाईने अवलोकन करणारा असा हा लेखक आहे.
‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेची सुरुवात होते ती २००० सालातल्या एका दिवसापासून. तो दिवस असतो ८ डिसेंबर १९९२. खरंतर दोन दिवस आधीच म्हणजे ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडली गेलेली असते; आणि त्यामुळे संपूर्ण देशभर दहशतीचं वातावरण तयार झालेलं असतं. देशभरात सगळीकडे संचारबंदी, हिंसा, दंगे, जाळपोळ, लुटालूट होत असताना बिलाल नावाचा एक गुंड दंग्यात मारला गेल्याचं वृत्त कथानायकाच्या कानावर येऊन पडतं. या बिलालने नायकालादेखील तू मशिदीच्या कुंपणाबाहेर का मुतलास म्हणून दम देऊन कानशिलात लगावलेली असते. त्या वेळी संताप झाला असला, तरी प्रत्यक्षात नायक काहीही करू शकत नाही. त्यामुळे दंगा होणं, जातिधर्मावरून तेढ वाढणं हे पसंत नसलेला नायक बिलालच्या मृत्यूने मात्र सुखावतो. मात्र हे सुखही क्षणिकच टिकतं. कारण याच बिलालची वृद्ध आई, आजारी बायको आणि चिमुकली तीन मुलं रस्त्यावर आलीत हे कळताच त्याच्यातला माणूस हेलावतो. ही घटना लिहीत असतानाच नायक या काळात जातिधर्मातली तेढ कशी वाढली गेली तेही वास्तव नोंदवून जातो. तत्पूर्वी वेगवेगळ्या जातिधर्माचे लोक – गावांत असो, की शहरात – गुण्यागोविंदाने राहत होते, जातीच्या नावावरून एकमेकांना हाका मारत होते. पण त्या वेळी असं संबोधताना आपण चुकीचं काहीतरी करतोय याचं भानही त्यांना नव्हतं. पण नंतर ते बदलत गेलेलं चित्र आणि त्या बदलाचे उमटलेले पडसाद लेखक सुरुवातीलाच नोंदवतो. धर्माविषयी, जातीविषयी अनेक प्रश्न लेखकाच्या मनात निर्माण होतात आणि तेच प्रश्न कुठल्याही निर्मळ मनाच्या व्यक्तीला, स्वच्छ दृष्टीच्या व्यक्तीला पडलेले असतात. ‘पूर्वी द्वंद्वयुद्धाच्या गोष्टी लिहिल्या गेल्या जायच्या, आता द्वंद्वंयुगाच्या लिहाव्या लागतील’ असंही लेखक म्हणतो. ‘भिकारचोट धंदा आहे धर्म म्हणजे’ असं उद्विग्न होत यातला नायक आपलं मत मांडतो.

बालाती सुतार हा नव्या दमाचा, नव्या ताकदीचा आणि आसपासचं वास्तव वेगळ्या शैलीत मांडणारा तरुण लेखक. राजन गवस यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘उद्या कथासाहित्याचा इतिहास लिहिताना बालाजी सुतार या लेखकाला वगळून पुढे जाताच येणार नाही.’

त्यानंतर २००८ उजाडतो आणि त्यातला एखादा दिवस, ज्या दिवशी कथेतला नायक भर उन्हात पाण्यासाठी वणवण करत असलेल्या मायलेकींना बघतो. शहरातल्या लोकांना मिळणारं मुबलक पाणी आणि आजही खेड्यापाड्यातली पाण्यावाचून होणारी दैना या नायकाला विचार करायला लावते. या स्त्रीची असहाय अवस्था बघणाऱ्याच्या लक्षात येत नाही, तर तिचं बाई असणं मात्र पटकन त्याच्या नजरेत भरतं, ही गोष्ट कथानायकाला बोचते. याच दरम्यान नायकाने गावात जाऊन ‘भाजप’ या पक्षाची शाखाही उघडलेली असते. (पुढे हाच नायक ‘ज्या शाखांना साध्यासरळ माणुसकीची फळं लागत नाहीत, त्या शाखा किंवा ती झाडं रोपून काय उपयोग?’ असा प्रश्नही विचारतो.) गावातले राजकारणी पक्ष आणि त्यांची दादागिरी, जात आणि पक्षातलं आपलं स्थान यांचा घेतलेला फायदा, एकमेकांवरच्या कुरघोडी आणि चढलेला माज हेही त्या-त्या प्रसंगातून अनुभवायला मिळतं. गावातलं जातीचं, निवडणुकीचं, आरक्षणाचं राजकारण, आणि तिथेही स्वार्थासाठी उपयोग करून कोणालातरी निवडून आणणं आणि आपलं इप्सित साध्य होईपर्यंत त्याचा ऱ्हास करणं… या सगळ्यांमध्ये पाण्याचा प्रश्न तसाच राहतो. मुबलक मिळणाऱ्या पाण्यापासून बिसलेरी वॉटरच्या बाटल्यांपर्यंत आपण कसे आलो हेही कळत जातं.
त्यानंतर उगवतं ते २०१३ साल! गावातला शेतमळा, विहीर असलेला शेतकरी… त्याच्याबद्दलच्या नायकाच्या मनात कोरलेल्या आठवणी आणि एकाएकी त्याने गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याची बातमी नायकाला कळते. या आत्महत्येची मुळं शोधताना बदलत गेलेली परिस्थिती, पाण्याचं आटणं, सगळं काही खर्चून केलेले प्रयत्न, हाती आलेलं अपयश आणि मग मुलाबाळांचंही संगोपन, लग्न आपण करू शकणार नाही, सावकाराचं देणं फेडू शकत नाही, त्याच्याकडून पदोपदी होणाऱ्या अपमानाला सहन करू शकत नाही यामुळे गळ्यात फास घेऊन त्या शेतकऱ्याने केलेली आत्महत्या नायकाला दिसते, कळते. या आत्महत्येमुळे सरकारकडून कुटुंबाच्या हातात पडणारे नेमके तुटपुंजे पैसे, त्याचा विनियोग कसा करायचा, थोडक्यात; फाटलेल्या आभाळाला ठिगळ कसं जोडायचं हा प्रश्न नायकाला पडतो. एका शिक्षकाला चारचाकी खरेदी करायची असेल तर काहीच मिनिटांत बँक कर्ज देते, पण शेतकऱ्याला मात्र वारंवार चकरा मारायला लावून शेवटी कर्ज देण्यास नकार देते ही परिस्थितीही नायक आपल्यासमोर आणून दाखवतो.
शेवटाकडे येताना, २०१७ साल उजाडतं. उजाडतं की मावळतीच्या दिशेला जातं हा प्रश्न नायक करत नाही, पण वाचकांच्या मनात हा प्रश्न तो पेरून जातो. आरक्षणाच्या मुद्द्याकडेही कथेतला नायक लक्ष वेधतो. शिकणारे जास्त डोकं चालवतात, ते नको म्हणून अडाणी लोकांना राजकारणात जास्तीत जास्त वाव मिळत राहतो, पण त्यांचीही अधोगती ठरलेलीच. तसंच, ‘बाजलं बदलून पोर होत नसतं, तर नवरापण बदलावा लागतो’ या म्हणीनुसार पूर्वीचं वंशपरंपरेने निवडून आलेलं सरकार नाकारून मोदी सम्राट सत्तेवर येतात. स्वर्गातून जणूकाही प्रेषित अवतरला असं समजून लोक भारावून त्याच्याकडे बघायला लागतात. याच काळात धार्मिक उन्माददेखील वाढतो. ‘आमच्या अटी आणि नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर जा पाकिस्तानात’ अशी भाषा देशभक्त करायला लागतात. अरे हो, या दरम्यान देशभक्तांचा जिकडे पाहावं तिकडे सुळसुळाट होतो. आध्यात्मिक आणि उद्योगी बाबांचाही जन्म होतो. जिथे आपल्याच हाताने आपल्याच पोरी बाबाच्या स्वाधीन मोठ्या भक्तिभावाने केल्या जातात.
नवीन साल येतं, त्या वेळी, ‘बाजलं बदलून पोर होत नसतं, तर नवरापण बदलावा लागतो’ यात बदल केला तरी ‘नवरा पण बदलून काही होत नाही’ हे वास्तव नायक दाखवतो. गोष्ट म्हटलं तर इथे संपते, पण तशी ती संपतच नाही. कारण हे विदारक वास्तव गोष्टीला संपू देत नाही.
लेखकाची पाळंमुळं गावच्या मातीत रुजलेली असल्यामुळे ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेतून गावच्या भाषेचा स्वाद आपोआपच येतो. लेखकाचा नायक शिकण्यासाठी जरी शहरात आलेला असला, तरी त्याची मुळं गावात रुजलेली असल्याने तिथली माणसं, तिथलं जनजीवन यांचं दर्शनही तो या कथेतून वाचकाला घडवतो. खरंतर माणसाची साधी स्वप्नं आता पूर्ण होण्याचे दिवस राहिले नसून त्याच्या आसपासची विदारक परिस्थिती, राजकारण, जात-धर्म यांच्यामुळे पोखरलेली मनं, बोकाळलेला स्वार्थ या सगळ्या तुकड्यांचं कोलाज म्हणजेच ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ ही कथा आहे.
ही कथा आवडण्याचं कारण म्हणजे लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे. कथेचं रूपडं प्राप्त झाल्याने वाचक या वास्तवात गुंतला जातो, ते वास्तव जर सरळ सरळ दाखवलं असतं, तर वाचकाला ते तितकंसं भिडणार नाही याची जाणीव लेखकाला असल्याने त्याने कथेचा फॉर्म निवडला असावा. अस्वस्थ करणारं वास्तव अशा प्रकारात गोष्टीस्वरूपात वाचकाच्या समोर येतं आणि वाचक त्यावर अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. ही कथा एक अस्वस्थ करणारं सत्य बरोबर घेऊन आपल्या अंत:करणात शिरते आणि तिथे आपलं स्थान शोधत राहते.-दीपी देशमुख

  • मला आवडलेले काही निवडक कथासंग्रह
    • अव्यक्त माणसांच्या कथा / लेखक- उत्तम कांबळे / मनोविकास प्रकाशन.
    • परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष / लेखक- हृषीकेश गुप्ते / रोहन प्रकाशन.
    • सृष्टीत गोष्टीत / लेखक- अनिल अवचट / मॅजोqस्टक प्रकाशन.
    • एक कुत्ते की मौत आणि इतर दोन कथा / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन.
    • जीवनचक्र / लेखक- निरंजन घाटे / मनोविकास प्रकाशन.
    • घनगर्द / लेखक- हृषीकेश गुप्ते / रोहन प्रकाशन.
    • निळ्या दातांची दंतकथा / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल नोव्हेंबर २०२०


गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा या लेखमालिकेतील इतर लेख

 Nitin-Rindhe
लेखक, समीक्षक व विचक्षण वाचक नीतीन रिंढे यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चंद्र
(लेखक : जयंत पवार)

‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…

लेख वाचा…


Kiran Yele
आघाडीचे लोकप्रिय कथाकार किरण येले यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : तीन लेखक, तीन कथा (जयंत पवार, भारत सासणे, राजन खान)

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…

लेख वाचा…


‘रोहन-मुद्रे’तले लक्षणीय कथासंग्रह

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट


सतीश तांबे


‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून

गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो.

या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच



250.00 Add to cart
Featured

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…


गणेश मतकरी, नीरजा,श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश ज. म., हृषीकेश पाळंदे


एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?


250.00 Add to cart

घनगर्द

हृषीकेश गुप्ते


हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.

ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.

त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी

मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.

हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.

तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.

महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.

म्हणूनच त्याच्या कथांमध्ये

एक चैतन्य सळसळताना जाणवतं.

‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून

हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.

ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे

भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.

मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.

त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.

पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.

याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.

– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)



340.00 Add to cart

अंगठी १८२०

अगस्ती इन अॅक्शन


श्रीकांत बोजेवार


अंगठी १८२०’ या कथेत सौंदर्यवती शगुफ्ता अगस्तीकडे तिच्या पूर्वजांची अंगठी शोधून काढण्याची केस घेऊन येते. त्या अंगठीचा सबंध बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध ‘खान’शी असल्याचं अगस्तीला समजतं. म्हणून तो खानच्या कुटुंबांची पाळंमुळं खणतो. तेव्हा समोर येतं वेगळंच रहस्य – वेगवेगळ्या कारणांसाठी ती अँटिक व्हॅल्यू असलेली अंगठी वेगवेगळ्या लोकांना हवी असते…

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’


120.00 Add to cart

केदारनाथची किमया आणि इतर २ कथा

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा


सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन


फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…
१. फेलूदाला हिरो मानणार्‍या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि ‘गायब झालेले अंबर सेन’ शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्‍याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट – त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो… फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण ‘केदारनाथची किमया’ घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो…!


140.00 Add to cart

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

प्रणव सखदेव


खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्‍या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!


250.00 Add to cart

परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष


हृषीकेश गुप्ते


‘मनापासून पतंग उडवणा‍ऱ्या’वर

‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं,

पण ती त्याच्यासोबत जाईल की

तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील?

समस्त स्त्रीजातीला समाधान देईल

असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला

तरी वास्तवात खरोखरीच

तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल?

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणा‍ऱ्या दोन अनवट दीर्घकथा!


120.00 Add to cart

व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४

रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा


शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन


बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्‍या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.

व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.

व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.

निखळ आनंद देणा‍र्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!



275.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *