Featured

250.00

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.
तिरकस राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लिखाणासाठी तसेच चित्रपटविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध. सकाळ, लोकसत्ता आणि आता महाराष्ट्र टाइम्स असा पत्रकारितेचा २८ वर्षांचा प्रवास. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक. चित्रपट समीक्षक तसेच रविवार पुरवणीचा समन्वयक म्हणून दीर्घकाळ काम. लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर ‘तंबी दुराई’ या नावाने १२ वर्षे लिहिलं, आणि ते सर्वदूर लोकप्रिय झालं आहे. त्याचे तीन खंड पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले व त्यांना ‘राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट विनोदी लेखना’चे दोन पुरस्कार मिळाले. पुढे ‘तंबी दुराई' याच नावाने ‘दीड दमडी’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये पाच वर्षे लिहिलं. ‘पावणे दोन पायाचा माणूस' ही कादंबरी प्रकाशित. पद्मगंधा, ऋतुरंग, आवाज, रूची, जत्रा अशा अनेक दिवाळी अंकांमध्ये सातत्याने लेखन केलं आहे. ‘एक हजाराची नोट', ‘ब्रेव्हहार्ट', ‘लोणावळा बायपास’. ‘माझी आई’ या आणि इतर चित्रपटांचे पटकथा-संवाद, गीत लेखन. ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘बंड्याचा फंडा’ इत्यादी मालिकांसाठी लेखन केलं आहे.
गणेश मतकरी शिक्षणाने आर्किटेक्ट असलेल्या गणेश मतकरी यांनी पंधरा वर्षांच्या कालावधीत आपली ओळख बनवली ती जागतिक चित्रपटांचा व्यासंगी समीक्षक म्हणून , आणि मग अचानक ते साहित्य क्षेत्राकडे वळले . नॅरेटीव फॉर्मचा कथा आणि कादंबरी अशा दोन्ही अंगांनी विचार करत त्यांनी आधुनिक शहरी समाजजीवनातली गुंतागुंत आपल्यासमोर मांडली . वैशिष्ट्यपूर्ण भाषा आणि दृश्यात्मकता हे त्यांच्या कथालेखनाचं वैशिष्ट्य मानता येईल . साहित्य आणि समीक्षा यांच्या जोडीला त्यांची मुशाफिरी आता पटकथालेखनातही सुरू झाली आहे .
हृषीकेश पाळंदे याचा जन्म १९८५ सालचा. तो पुण्यातच शिकला आणि वाढला. आर्किटेक्चरची डिग्री अर्धवट सोडून त्याने बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स केलं. त्यानंतर एम.एस्सी व डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्सेसही त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर कुठलीच नोकरी नीट केली नाही. अर्धवट सोडणं, हे त्याचं लक्षण बनलं. 'काय करणारेस तू पुढे?' या प्रश्नाला कंटाळून कुटुंब आणि पुण्याला सोडून २०११ साली अहमदाबाद ते जम्मू असा १९०० किमीचा एकांडा सायकलप्रवास त्याने केला. या सफरीत त्याला स्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग प्रश्न पडले. तो डोक्यातला गुंता त्याने 'दोन चाकं आणि मी' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून लिहिला. डोक्यातल्या प्रश्नांच्या चक्राला वाहिलेल्या 'बयो' आणि 'भरकटेश्वर' या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. त्यानं अजूनतरी लिखाणाला सोडलं नाहीये. सध्या तो कोकणात राहतोय. चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.
परेश जयश्री मनोहर मूळचा भटक्या आहे , मनाच्या कोअरमध्ये कार्यकर्ता .... भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेसोबत गेली वीस वर्षं काम करतोय . सामाजिक कामाला वाहिलेल्या टाटा ट्रस्टच्या Deta Driven Governance टीममध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून नोकरी करतो . भवताल बघत असतो , अस्वस्थ असतो , व्यक्त होतो आणि कामही करतो .
नीरजा या ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या कवयित्री व कथालेखिका . एक बंडखोर व स्त्रीवादी कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे . त्यांच्या लेखनातून सामाजिक तसंच राजकीय भान त्या व्यक्त करतात . त्यांनी ललित व चिंतनपर लेखनही केलं आहे . स्त्री पुरुष नात्यातील अनेकविधतेचा , गुंतागुंतीचा आणि संदिग्धतेचा त्या वेध घेऊ पाहतात . एकूणच नात्या - नात्यातील संवाद - विसंवादाचं वास्तवदर्शी चित्रण संवेदनशीलपणे त्या लेखनातून करतात .
प्रवीण धोपट यांचे कथा , कादंबरी आणि नाटक हे विशेष आवडीचे लेखनप्रकार . मुक्त पत्रकारितेपासून लेखनाला सुरुवात . प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्यलेखन तसंच सिनेमासाठी कथा , पटकथा आणि संवादलेखन .
मनस्विनी लता रवींद्र ही विविध माध्यमांतून स्वैरपणे लिखाण करणारी लेखिका आहे . लहानपणी ती कविता लिहायची , पण पुढे नाटकाचं औपचारिक शिक्षण घेतल्यावर तिला नाटक हे माध्यम हाताळून बघावंसं वाटलं . एकविसाव्या वर्षी तिचं पहिलं नाटक आलं सिगरेटस् . टेलिव्हीजनच्या मालिकांपासून ते चित्रपट , ऑडिओ सिरिज , वेब सिरिज असे सर्व प्रकारचं लिखाण ती करते . तिने कथालेखन सुरू केलं असून नाटक आणि कथा दोन्हीमध्ये आकृतिबंध आणि आशय यात काही प्रयोग करून बघते आहे . नातेसंबंध आणि त्यातलं राजकारण यात तिला अधिक रुची असून , माणसाचे तपशील तिला रोचक वाटतात .

एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?


Reading Time: 1 Minutes (140 words)

438 978-93-89458-18-3 Love in the Time of Corona लव्ह इन द टाइम ऑफ करोना कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या… Ganesh Matkari, Niraja, Shrikant Bojewar,
Pravin Dhopat,
Manaswini Lata Ravindra, Pranav Sakhdeo,
Paresh Jayashi Manohar, Hrushikesh Palande
गणेश मतकरी, नीरजा,श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश ज. म., हृषीकेश पाळंदे
प्रणव सखदेव परेश जयशी मनोहर, हृषीकेश पाळंदे
एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 200 21.6 14 1.1 240 मोहर Fiction कथा-कादंबरी 250 LoveintheTimeofCoronacover LoveintheTimeofCoronacoverBC.jpg
Weight 240 g
Dimensions 21.6 × 14 × 1.1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.