446 | 978-93-89458-30-5 | Angathi 1820 | अंगठी १८२० | अगस्ति इन अॅक्शन | Shrikant Bojewar | श्रीकांत बोजेवार | अंगठी १८२०’ या कथेत सौंदर्यवती शगुफ्ता अगस्तीकडे तिच्या पूर्वजांची अंगठी शोधून काढण्याची केस घेऊन येते. त्या अंगठीचा सबंध बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध ‘खान’शी असल्याचं अगस्तीला समजतं. म्हणून तो खानच्या कुटुंबांची पाळंमुळं खणतो. तेव्हा समोर येतं वेगळंच रहस्य – वेगवेगळ्या कारणांसाठी ती अँटिक व्हॅल्यू असलेली अंगठी वेगवेगळ्या लोकांना हवी असते…
रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 104 | 18.5 | 12 | 0.8 | 120 | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 120 | Angthi1820 | Angthi_QBC.jpg |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४
रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.
व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.
व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.
निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.