एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. ‘ब्लॅक प्रâायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता. अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने सत्य घटनेवरील आधारित प्रसंगांना रंजक कथा शैलीत बांधणारा असा हा हाडाचा पत्रकार लेखक आहे. झैदी यांच्या कादंबर्‍या वाचत असताना आपण एखादी क्राइमवरची वेब सिरीज बघतोय की काय असाच प्रश्न पडतो.

‘एलेव्हन्थ अवर’, ‘एन्ड गेम’ आणि ‘मुंबई अव्हेंजर्स’ या सर्व कादंबर्‍यांमधून कथानक झपाझप पकड घेत जातं आणि वेगाने नवनवीन रहस्य उकलत राहतं. ‘एन्ड गेम’ हा ‘इलेव्हन्थ अवर’ या कादंबरीचा उत्तरार्ध. या भागामध्ये विक्रांत आणि मिर्झा ही गुरू-चेल्याची जोडी पुन्हा एकदा अवतरली आहे. ‘बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात.

‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्य्राला पोचतात. इथे एका घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबर्‍याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर; त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो. राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि थरार यांची उत्तम गुंफण असणारी अशी ही कादंबरी आहे. 


 एन्ड गेम   लेखक : एस. हुसैन झैदी  किंमत रु.२४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *