211 | 978-93-80361-94-9 | Garodarpanat Konate Padarth Talavet ? | गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत | G. Padma Vijay | जी. पद्मा विजय | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात. या पुस्तकात टाळावेत असे काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ का खाऊ नयेत, त्यामागील शास्त्रीय कारणं कोणती व खाल्ल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील सांगितलं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीला आपला आहार ठरवताना योग्य ती सावधता बाळगता येईल. प्रत्येक गरोदर स्त्रीचं स्वप्न असतं, सुदृढ व लोभस बाळाचं! हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 88 | 21.6 | 14 | 0.4 | 120 |
The book helps pregnant women make the right food choices and makes them aware of the foods to be avoided during pregnancy for the well being of the fetes. The book makes pregnant women understand the importance of kitchen hygiene, food safety and personal hygiene to prevent food and water-borne illnesses.
|
Health | आरोग्य | Parenting | पालकत्व | 75 | Garodarapanat Konte Padarth Talavet_jpg | Garodarapanat Konte Padarth Talavet_BackBC.jpg |
घरगुती औषधोपचार
प्रेमलता परळीकर
दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’!
सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या.
Reviews
There are no reviews yet.