कलेचा आस्वाद कसा घ्यावा? (‘पेन’गोष्टी)

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, [...]

येणे स्वरयज्ञे तोषावें… (‘पेन’गोष्टी)

लता मंगेशकर नावाचं सातअक्षरी स्वरपर्व आपल्या आयुष्यातून संपलं. असं कधी होईल याचा विचारही केला नव्हता. तसा विचार मनात आला तरी तो तातडीनं झटकून टाकला जायचा. लताच्या जाण्यानं आपलं नक्की काय नुकसान झालंय हे समजायला काही काळ जावा लागेल. सध्या तरी केवळ बधिरपणा आलाय. पंचेद्रियांना आत्ता काहीही ऐकायचं नाही, बघायचं नाही, पचवायचं नाही; कारण सोसवायचंच नाही. मन मोठं [...]

लेख झाला का? (‘पेन’गोष्टी)

दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी [...]

बोल्ड अँड हँडसम (‘पेन’गोष्टी)

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, की पूर्वी इतर सर्व उद्योगांसोबत हवी तेवढी पुस्तकं मनसोक्त वाचण्याचा एक कार्यक्रम असे. लायब्ररीतून सकाळी आणलेलं पुस्तक संध्याकाळी बदलून आणायला जायचो. ग्रंथपालकाका हसून विचारायचे, की अरे, खरंच वाचून झालंय का? पण पुस्तक एवढं आवडीचं असायचं, की ते खरोखर दिवसभरात वाचून व्हायचं. कधी दुसरं पुस्तक आणतो, असं होऊन जायचं. अगदी लहानपणापासून थरारक [...]

सर्जनाचे ‘स्थळ’ (‘पेन’गोष्टी – नवं सदर)

रात्रीची वेळ आहे... सगळा आसमंत शांत झोपला आहे... आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे... आत शांत शांत वाटतं आहे... अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं... आधी त्यावरून हात फिरवून माया करावी... पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात... मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा... त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी... आपल्या [...]

सोप्या भाषेत मेंदूचं मन उलगडणारं पुस्तक

फॉन्ट साइज वाढवा मेंदू हा माझा विज्ञान-साहित्याएवढाच आवडता विषय. ह्या विषयात माझ्याप्रमाणे आवडीने लेखन करणारा लेखक म्हणजे सुबोध जावडेकर. त्यामुळेच आमच्या मैत्रीचा धागा जुळला, घट्ट झाला. त्यांच्या दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकावर मी लिहिणार आहे; ते म्हणजे ‘मेंदूच्या मनात’. त्याचं दुसरं पुस्तक म्हणजे ‘पुढच्या हाका’. सुबोध विज्ञान-साहित्याला इतर साहित्यातून वेगळं करत नाहीत. ते बरोबरच आहे. त्यामुळे [...]

मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी

२३ एप्रिल रोजी असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना'निमित्त ‘माझी निवड’ स्तंभात बहुविध वाचन करणारे सोलापूरस्थित वाचक व लेखक नीतीन वैद्य यांनी लेखन केलं आहे. वैद्य सातत्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या ललित तसंच ललितेतर ग्रंथांचं वाचन करत असतात. गुणवत्ता यादी बंद झाली, प्रश्नपत्रिका वाचायला अधिकचा वेळ मिळू लागला, तोंडी परीक्षा आणि कलाक्रीडाकौशल्यांच्या कागदी चवडींमधून अतिरिक्त गुणांची [...]

श्रीकांत बोजेवारांचा जेम्स बाँड : ‘अगस्ती इन अॅक्शन’

मला नाही वाटत, आज सत्तरी पार केलेले माझ्यासारखे जे मराठी वाचक आहेत, त्यांनी त्यांच्या किशोरवयात बाबूराव अर्नाळकर लिखित रहस्यकथा मिटक्या मारत वाचलेल्या नसतील! थोडं वय वाढलं, मग तरुणपणी बऱ्यापैकी इंग्रजी कळू लागलं तेव्हा, अर्नाळकरांच्या धनंजयची जागा हॉलीवूडच्या रगेल-रंगेल जेम्स बॉण्डने घेतली. तो जेम्स बॉण्ड जास्तीत जास्त वेळ रुपेरी पडद्यावर साकारणारा अभिनेता शॉन कॉनेरी अलीकडेच कालवश [...]

अद्‍भुत आणि रम्य

‘बाकड्यासमोर एक तरुण मुलगा बसला होता - जाडगेला, डोक्याचे संपूर्ण केस भादरलेले आणि अंगावर फाटक्या चिंध्या. मी त्याला बरेचदा पाहिलं होतं. तो वेडा होता बहुधा. लोक त्याला ‘गूंगा’ म्हणत. चहाच्या दुकानात येणारी गिऱ्हाइकं बरेचदा त्याची चेष्टा करत, टर उडवत, त्याच्या डोक्यावर टपली मारत. पण हे गमतीगमतीत बरं का. गूंगालाही त्याचं काही वाटत नसे. तो त्यांच्याकडे [...]

‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ पुस्तकातील ‘नाकबळी’ कथेतला निवडक अंश

शेअरबाजार आणि इतर बाजार यांतील महत्त्वाचा फरक काय? अंजोरला मुळात कळलंच नाही की, आशु नक्की काय म्हणतो आहे ते.तसं दोघांना सवड मिळाली की, त्यांचं मनमोकळं चॅट चालायचंच. त्यात काहीतरी नेहमीसारखेच उडते विषय सुरू असताना आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’ ह्यावर तिने लिहिलं : ‘‘शी, घाणेरडा! त्यात मी [...]
1 2 4