Pushpa-Bhave

‘रोहन साहित्य मैफल’च्या प्रकाशकांनी संपादकीय मनोगताची जागा या अंकापुरती कमी केली आहे. तेव्हा या अंकात मुद्द्यांना केवळ स्पर्शच करणं आलं. पण त्यामुळे संपादक थोडे नाराज असतील असा जर कोणी अंदाज बांधला, तर तो फोल ठरेल. त्याला कारण असं की, या अंकाच्या मैफलीत सहभागी झाले आहेत तीन मान्यवर पाहुणे कलाकार आणि त्यांचे तीन वैशिष्ट्यपूर्ण लेख. लेखक व समीक्षक प्रा. नितीन रिंढे, लेखक-कवी किरण येले आणि लेखिका व उत्साही वाचक दीपा देशमुख यांनी आमच्या विनंतीनुसार, दिलेल्या विषयावर अल्पावधीत आणि उत्कृष्ट लेख लिहून दिले. हे लेख वाचकांसाठी उत्तम बौद्धिक मेजवानीच ठरणार आहेत. त्यामुळे मीही संपादक व वाचक या दोन्ही भूमिकांतून आनंदी आहे… नाराज असणं तर दूरच. या लेखांचे विषय कोणते, याविषयी उत्सुकता जरा ताणून धरतो. ते सर्व पुढे सुरुवातीच्या प्रास्ताविकात येईलच. तेव्हा द्विरुक्ती टाळतो.

वय होणं, त्यात आजारपण येणं, त्यात निधन होणं या गोष्टी कुणालाच चुकणार नाहीत. या गोष्टी बौद्धिक पातळीवर आपण स्वीकारायलाच हव्यात. आणि योग्य ते गांभीर्य राखून आपण त्या स्वीकारतोही. ज्या व्यक्तीचं कार्य मोठं, त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर सर्वसाधारणपणे त्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. परंतु वस्तुस्थिती अशी असते की, वृद्धापकाळामुळे किंवा गंभीर आजारामुळे अनेक व्यक्तींचं कार्य थांबतं व त्यांच्या कार्य-क्षेत्रात त्यांच्या निधनापूर्वीच ही पोकळी निर्माण झालेली असते.

सुप्रसिद्ध समाजकार्यकर्त्या आणि लढवय्या प्रा. पुष्पा भावे यांचं ३ ऑक्टोबर रोजी निधन झालं. परंतु त्यांच्या गंभीर आजारामुळे आणि हालचालींवर आलेल्या निर्बंधांमुळे त्यांच्या कामाचा झंझावात थांबून काही वर्षं झाली होती. आणि तेव्हापासूनच अनेक व्यासपीठांवरील त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या कार्य-क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीच होती. मात्र, पुष्पाताईंसारख्या व्यक्तींच्या अशा परिस्थितीतील निधनामुळे पोकळी निर्माण होते, ती भावनिक, जसं माझ्या बाबतीत झालं. काही पुस्तकांच्या निमित्ताने पुष्पा ताई आणि मी एकत्र काम केलं आहे. तरीही वैयक्तिक जिव्हाळा हाच आमच्यातील संबंधांचा मूळ धागा होता. सालाबादप्रमाणे या वर्षीही त्यांचा १४ ऑगस्ट रोजी म्हणजे माझ्या वाढदिवशी प्रकृती अस्वाथ्य असतानाही सकाळी लवकरच फोन आला… नेहमीच्या आत्मीयतेने त्यांनी शुभेच्छा दिल्या. थोड्या गप्पा झाल्या. त्यामुळे मला झालेला आनंद त्यांच्यापुढे मी व्यक्त केला. त्या त्यांच्या शुभेच्छा आता अखेरच्या ठरल्या आहेत. निर्माण झालेली अशी भावनिक पोकळी मात्र भरून येणं कठीण असतं…
…या वर्षीच्या दिवाळीवर करोनाचं मळभ आहे. तेव्हा आपल्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सण साजरा कराताना उत्साह आवरते घ्यावे लागतील. पुस्तक-वाचनासाठीचा उत्साह वाढवून त्या आवरत्या उत्साहाची भरपाई केली तर? सर्वांना करोनामुक्त दिवाळीसाठी शुभेच्छा !

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल नोव्हेंबर २०२०


गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा लेखमालिकेतील लेख

 Nitin-Rindhe
लेखक, समीक्षक व विचक्षण वाचक नीतीन रिंढे यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चंद्र
(लेखक : जयंत पवार)

‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…

लेख वाचा…


Deepa deshmukh
लेखिका व उत्तम वाचक दीपा देशमुख यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी
(लेखक- बालाजी सुतार.)

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…

लेख वाचा…


Kiran Yele
आघाडीचे लोकप्रिय कथाकार किरण येले यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : तीन लेखक, तीन कथा (जयंत पवार, भारत सासणे, राजन खान)

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…

लेख वाचा…


रोहन शिफारस

गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम

महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युद्ध ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिद्ध केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…

Good-Muslim-Bad-Muslim

395.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *