अगाथा ख्रिस्तींनी मिस मार्पले आणि हर्क्यूल पॉयरॉ अशा दोन स्वयंभू डिटेक्टिव पात्रांना रहस्यकथांच्या साहित्यविश्वात आणलं. अर्ल स्टॅनली गार्डनर यांनी पेरी मेसन आणि पॉल ट्रेक अशा दोघांना वकील आणि डिटेक्टिव म्हणून सादर केलं. ऑर्थर कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्स आणि डॉक्टर जॉन वॉट्सन या अजरामर व्यक्तींना कल्पनाविश्वातून साहित्य-सत्यात आणलं. करमचंद या डिटेक्टिव हिंदी सिरियलने त्याच नावाचा स्वयंभू इन्व्हेस्टिगेटर आणि ‘किट्टी’ या त्याच्या सहकारिणीला छोट्या पडद्यावर आणून प्रेक्षक-दर्शकांच्या छातीचा ठोका हलकेच चुकवला. सत्यजीत रे यांच्यासारख्या मातब्बर चित्रपटकार-लेखकाने फेलुदा आणि तपेश उर्फ टोपशे या दोन विलक्षण पात्रांना बंगाली भाषेत आणून अवघ्या बंगाली सामाजिक-कौटुंबिक जीवनाचा भाग करून टाकले. आपल्या ‘अस्सल देशी’ आणि मराठी बाबूराव अर्नाळकरांनी दीड हजारहून अधिक कथा-कादंबऱ्या लिहिल्या, पण लोकांच्या मनात अजूनही ठसले आहेत, ते – त्यांचे धैर्यशील व कल्पक धनंजय आणि झुंजार – गुन्हेगारांच्या गुहेत घुसणारे!
आता आपल्या श्रीकांत बोजेवार यांनी आणलेला असाच एक चलाख, कर्तबगार, चिकित्सक, धडाडीचा, बुद्धिमान आणि सर्वज्ञ-सदृश असा अगस्ती नावाचा डिटेक्टिव चित्तथरारक आणि गुन्हेगारी विश्वात लीलया वावरतो आणि तितक्याच सहजतेने ग्लॅमर-सेलीब्रिटी जगात मिसळून जातो. त्याचा सहकारी आहे वसंतराव इंगळे. परंतु तो सहकारीही अगस्तीच्या जेम्स बाँडसदृश व्यक्तिमत्त्वाने पूर्ण भारावलेला आहे.

या तीनही कादंबऱ्यांचं कथानक थोडक्यात सांगताही येणार नाही – आणि सांगणंही अयोग्य! तसं पाहिलं तर बोजेवार आहेत पत्रकार-संपादक. पत्रकाराला रोज काही प्रमाणात का होईना पण विविध रहस्यांचा शोध घ्यायचाच असतो. बोजेवारांकडे असणाऱ्या लिहिण्याच्या हातखंड्यामुळे या कादंबऱ्यांमधून त्यांच्या ‘शोधपत्रकारितेचा’ ही पुरावा पानोपानी मिळतो.

सुमारे १३० वर्षांपूर्वी मराठी साहित्याचे एक दीपस्तंभ हरि नारायण आपटे यांनी रहस्यकथेच्या आधुनिक अवताराला जन्म दिला, असे रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या तीन लघुकादंबऱ्यांच्या अर्पणपत्रिकेत श्रीकांत बोजेवार वाचकाला सांगतात. या १३० वर्षांत महाराष्ट्रात कित्येकांनी हा साहित्यप्रकार परिणामकारकरीत्या हाताळला आहे. अगदी रत्नाकर मतकरी, नारायण धारप ते गेल्या शतकातले नाथमाधव, गो. ना. दातार यांच्यापर्यंत. या सर्वांमध्ये द्रोणाचार्य होते बाबूराव अर्नाळकर! असो.

Agasti-Set-Cover

पण बोजेवारांनी त्यांच्या रहस्यकथा-त्रिकुटाला वेगळा बाज दिला आहे. सध्याचे बॉलीवूड आणि मॉडेलिंगने झगमगलेलं तारांकित जीवन आणि पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये होणारी पैशाची व दारूची उधळण, श्रीमंत आणि धनदांडग्यांच्या आयुष्यातील मस्ती आणि मौज, त्यांच्या त्या धुंद जीवनशैलीला असलेलं माफियांचं परिमाण, त्या माफियांचे अगदी झोपडपट्टीतील दादांबरोबरचे संबंध, खून, ब्लॅकमेल, दहशत, दादागिरी आणि बेभानपणे होणारा पिस्तूल-बंदुका, तलवारी-सुऱ्यांचा वापर या गोष्टी पाहता, समृद्ध जीवनही कवडीमोलाचे ठरावे आणि ती समृद्धीही बांडगुळी! हा पट त्यांच्या या लघुकादंबऱ्यांमधून उलगडताना बोजेवारांची विलक्षण विनोदशैली आणि पात्रांच्या (व वाचकांच्या) फिरक्या घेण्याची त्यांची अफलातून धाटणी अशा रीतीने येते की, गुन्हेगारीच्या काळ्या गुहेत शिरूनही आपल्याला हलके हसण्याचा मोह आवरत नाही. किंबहुना जेम्स बाँड चित्रपटांप्रमाणे आपल्याला त्या खुनाखुनी, अपहरण यांसारख्या गोष्टीही चमचमणाऱ्या करमणुकविश्वात रमवतात!एका व्यापक दृष्टिकोनातून सर्व वाङ्मय हे तसं रहस्यमयच असतं. अगदी प्रेमकथा असो वा ऐतिहासिक कादंबरी, कौटुंबिक नाटक असो वा सामाजिक, राजकीय समस्याप्रधान चित्रपटकथा –रहस्य नसेल तर वाचक-प्रेक्षकांची उत्कंठा शेवटपर्यंत टिकणारच नाही, त्याच व्यापकतेचं विशाल वाङ्मयीन रूप म्हणजे रामायण आणि महाभारत. छोट्या पातळीवर अगदी सत्यनारायणी कथाही रहस्यमय असते–किंवा टारझन आणि जंगलबुकमधील मोगलीचं विश्वही रहस्यमयच असतं.
पण, ‘रहस्यकथा’ म्हणून ओळखला जाणारा जॉनर हा प्रामुख्याने गुन्हेगारीशी संबंधित. बहुतेक वेळा खून! गुन्हाअन्वेषणाची प्रक्रिया, गुन्ह्यामागे दडलेल्या व्यक्ती आणि शक्तींचा कुशलतेने केलेला शोध, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा सर्जनशील उपयोग करून केलेलं गुन्ह्याचं–गुन्हेगाराचं विश्लेषण आणि संशोधन हे सर्व उत्कंठापूर्वक सादर केले की होते रहस्यकथा वा हेरकथा वा ‘मिस्टरी’! अलीकडे या जॉनरमध्ये सेक्स-व्हायोलन्स-कॉन्स्पिरसी हा त्रिकोण असतोच, अगदी हिचकॉक ते बाँडपर्यंत सर्वांचा!
बोजेकरांनीही ही त्रिसूत्री बेमालूमपणे त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये सफाईने विणली आहे. पहिली कादंबरी ‘हरवलेली दीड वर्ष’! या नावातही रहस्य आहे आणि कथानकातही. दुसरी कादंबरी ‘अंगठी १८२०’ – नावावरून अंदाज येणार नाही, पण सुरुवात होता होताच वाचकही त्या अंगठीच्या शोधाला लागतो. तिसरी कादंबरी आहे ‘न्यूड पेन्टिंग@१९’ पण ही कादंबरी नावावरून वाटते तितकी ‘पॉर्न’ नाही.
या तीनही कादंबऱ्यांचं कथानक थोडक्यात सांगताही येणार नाही – आणि सांगणंही अयोग्य! तसं पाहिलं तर बोजेवार आहेत पत्रकार-संपादक. पत्रकाराला रोज काही प्रमाणात का होईना पण विविध रहस्यांचा शोध घ्यायचाच असतो. प्रत्येक दिवशीच्या वृत्तपत्रात ‘क्राइम पेट्रोल’सारख्या मालिकेला खाद्य पुरवणारं रहस्यमय काही ना काही असतंच. बोजेवारांकडे असणाऱ्या लिहिण्याच्या हातखंड्यामुळे या कादंबऱ्यांमधून त्यांच्या ‘शोधपत्रकारितेचा’ ही पुरावा पानोपानी मिळतो.
‘क्राइम पेट्रोल’ वरून आठवलं, अगस्तीच्या या तीनही कादंबऱ्यांमधून लहान लहान उत्तम मालिका होऊ शकतील. कथा तर तयार आहेतच आणि बोजेवार उत्तम पटकथाकारही आहेत!

-कुमार केतकर

पूर्वप्रकाशित रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२१


अगस्ती इन अॅक्शन संच

Agasti-Set-Cover

डिटेक्टिव्ह अगस्तीच्या PAGE-TURNER कथा…

३ थ्रिलर्स

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’

360.00Add to cart


Shrikant-Bojewar
पत्रकार व चतुरस्र लेखक श्रीकात बोजेवार यांच्याबद्दल इथे अधिक जाणून घ्या…

तिरकस राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लिखाणासाठी तसेच चित्रपटविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध. सकाळ, लोकसत्ता आणि आता महाराष्ट्र टाइम्स असा पत्रकारितेचा २८ वर्षांचा प्रवास.

वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *