कलेचा आस्वाद कसा घ्यावा? (‘पेन’गोष्टी)

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, [...]

येणे स्वरयज्ञे तोषावें… (‘पेन’गोष्टी)

लता मंगेशकर नावाचं सातअक्षरी स्वरपर्व आपल्या आयुष्यातून संपलं. असं कधी होईल याचा विचारही केला नव्हता. तसा विचार मनात आला तरी तो तातडीनं झटकून टाकला जायचा. लताच्या जाण्यानं आपलं नक्की काय नुकसान झालंय हे समजायला काही काळ जावा लागेल. सध्या तरी केवळ बधिरपणा आलाय. पंचेद्रियांना आत्ता काहीही ऐकायचं नाही, बघायचं नाही, पचवायचं नाही; कारण सोसवायचंच नाही. मन मोठं [...]

लेख झाला का? (‘पेन’गोष्टी)

दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी [...]

बोल्ड अँड हँडसम (‘पेन’गोष्टी)

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, की पूर्वी इतर सर्व उद्योगांसोबत हवी तेवढी पुस्तकं मनसोक्त वाचण्याचा एक कार्यक्रम असे. लायब्ररीतून सकाळी आणलेलं पुस्तक संध्याकाळी बदलून आणायला जायचो. ग्रंथपालकाका हसून विचारायचे, की अरे, खरंच वाचून झालंय का? पण पुस्तक एवढं आवडीचं असायचं, की ते खरोखर दिवसभरात वाचून व्हायचं. कधी दुसरं पुस्तक आणतो, असं होऊन जायचं. अगदी लहानपणापासून थरारक [...]

सर्जनाचे ‘स्थळ’ (‘पेन’गोष्टी – नवं सदर)

रात्रीची वेळ आहे... सगळा आसमंत शांत झोपला आहे... आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे... आत शांत शांत वाटतं आहे... अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं... आधी त्यावरून हात फिरवून माया करावी... पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात... मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा... त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी... आपल्या [...]

श्रीकांत बोजेवारांचा जेम्स बाँड : ‘अगस्ती इन अॅक्शन’

मला नाही वाटत, आज सत्तरी पार केलेले माझ्यासारखे जे मराठी वाचक आहेत, त्यांनी त्यांच्या किशोरवयात बाबूराव अर्नाळकर लिखित रहस्यकथा मिटक्या मारत वाचलेल्या नसतील! थोडं वय वाढलं, मग तरुणपणी बऱ्यापैकी इंग्रजी कळू लागलं तेव्हा, अर्नाळकरांच्या धनंजयची जागा हॉलीवूडच्या रगेल-रंगेल जेम्स बॉण्डने घेतली. तो जेम्स बॉण्ड जास्तीत जास्त वेळ रुपेरी पडद्यावर साकारणारा अभिनेता शॉन कॉनेरी अलीकडेच कालवश [...]

बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी

अगाथा ख्रिस्तींनी मिस मार्पले आणि हर्क्यूल पॉयरॉ अशा दोन स्वयंभू डिटेक्टिव पात्रांना रहस्यकथांच्या साहित्यविश्वात आणलं. अर्ल स्टॅनली गार्डनर यांनी पेरी मेसन आणि पॉल ट्रेक अशा दोघांना वकील आणि डिटेक्टिव म्हणून सादर केलं. ऑर्थर कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्स आणि डॉक्टर जॉन वॉट्सन या अजरामर व्यक्तींना कल्पनाविश्वातून साहित्य-सत्यात आणलं. करमचंद या डिटेक्टिव हिंदी सिरियलने त्याच नावाचा [...]

‘हरवलेलं दीड वर्ष…’ कादंबरिकेतील निवडक भाग

‘नमस्कार!’ मिसेस हंसा रामचंद्रनने हात जोडले आणि म्हणाली, ‘तुम्ही तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच तरुण आहात.’‘हो. २९ एप्रिल १९८८ या दिवशी आमीर खानचा ‘कयामत से कयामत तक’ रिलीज झाला आणि त्याच दिवशी माझा जन्म झाला!’मिसेस रामचंद्रन आपले पातळसे, नाजूक ओठ रुंदावत, दोन्ही बाजूंना खळ्या पाडत, कळीदार शुभ्र दात दाखवत, मोजकं तरीही मनापासून हसल्या. जणू सोनेरी व्हिस्कीच्या [...]

‘न्यूड पेंटिंग १९’ कादंबरिकेतील निवडक भाग

…कुलाब्यातील रीगल थिएटरसमोर अगस्ती टॅक्सीमधून उतरताच एक जण अदबीने पुढे आला आणि म्हणाला, ‘सर, माझ्यासोबत या.’ त्या व्यक्तीसोबत चालत चालतच अगस्ती गेट वे ऑफ इंडियाला पोचला. ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची पत्नी क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी १९११ साली बांधण्यात आलेल्या, रोमन, भारतीय आणि मुस्लीम वास्तुशैलींचं मिश्रण असलेल्या त्या शानदार कमानीकडे अगस्ती कौतुकाने पाहत असतानाच, [...]

रहस्यकथांचे दिवस आणि अगस्ती…

आपलं वय वाढतं, आपण शहाणे होतो, वयानुसारच्या भावनांसोबत हळूहळू कधी इतरांसारखे होतो, ते आपल्यालाच कळत नाही. आपण इतरांसारखे होतो म्हणजे नेमके काय होतो? आपल्यातलं काही तरी रहस्यमय रीतीनं नाहीसं होत जातं. आपणच आपल्यात स्पष्ट होत होत, आपल्यातलं काही गूढ विरत जातं. ज्या दिवशी अंधाराबद्दल आत्मीयता निर्माण होते, त्या दिवशी आपल्यातली भीती मरून जाते. एका अमूर्त [...]
1 2