64 | Madhumeh Arthath Diabeties (Doctor series) | डायबीटीझ् अर्थात मधुमेह | गप्पा डॉक्टरांशी मालिका | Dr. Javadekar | डॉ. जावडेकर | आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत . | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 144 | 18.5 | 10.5 | 0.6 | 100 |
Information about diabetes
|
Health | आरोग्य | 60 | Madhumeh Arthat Diabeties.jpg | Madhumeh Arthat DiabetiesBC.jpg |
नैसर्गिक सौंदर्यसाधना
हरी कृष्ण बाखरू
अनुवाद : डॉ. अरुण मांडे
निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपद्धती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरुपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.
कृत्रिम प्रसाधनांमुळे तात्पुरते आणि बाह्यांगी सौंदर्य वाढले, तरी त्यासोबत येणारे दुष्परिणामही लपलेले नाहीत. अशा कृत्रिम उपायांना नैसर्गिक पर्याय कोणते, सौंदर्यासंदर्भातील विविध तक्रारींवर कोणते निसर्गोपचार प्रभावी ठरू शकतात, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य नैसर्गिक उपायांनी जोपासण्याचे मार्ग कोणते याची नेमकी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे.
० तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय ० त्वचारोगांवर निसर्गोपचार ० चमकदार डोळ्यांसाठी उपाय ० डोळ्यांच्या समस्यांवर उपाय ० चमकदार दातांसाठी उपाय ० केसांची नैसर्गिक निगा ० हातापायाची निगा ० सुडौल शरीरासाठी उपाय ० सौंदर्यासाठी विशिष्ट आहार ० विविध वनौषधी ० व्यायाम ० योगासने
Reviews
There are no reviews yet.