उत्तम आरोग्याचा नैसर्गिक मार्ग
एक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे.
डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.
अनुवाद :
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. उत्तम आरोग्यासाठीच्या या नैसर्गिक मार्गाची काही उदाहरणे पहा –
संधिवातावर : केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद
दम्यावर : बेलफळ, अंजीर, द्राक्ष, आवळा, संत्र, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध
मधुमेहावर : पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेट्यूस, सोयाबीन, टॉमेटो, हरभरे, भुईमूग
पित्तावर : पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस
उच्च रक्तदाबावर : भात, लसूण, लिंबू, सफरचंद
लठ्ठपणावर : लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमूग
Reviews
There are no reviews yet.