Reading Time: 2 Minutes (218 words)
151 | 978-93-80361-21-5 | Pathdukhi Visara | पाठदुखी विसरा… | Dr. Yatish Agarwal | डॉ. यतीश अगरवाल | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुष, मुलं-मुली, तरुण-तरुणी आणि वयस्क-वृध्द कुणालाही पाठदुखीचा त्रास संभवतो. मात्र मध्यमवयातच पाठदुखीची सुरुवात होण्याचे प्रमाण जास्त आढळते. जीवनाच्या सर्वोत्तम अशा या टप्प्यावर तुम्हाला पाठदुखीने बेजार केलं तर तुमच्या अनेक उद्दिष्टांना खीळ बसू शकते, जीवनातील अनेक आनंदांना तुम्ही पारखे होऊ शकता. ‘पाठदुखी विसरा…’ हे पुस्तक वरील वास्तवाचे विस्मरण होऊ देत नाही. अनेक प्रकारे तुम्हाला ते साथ देतं. पाठदुखीसंबंधी संपूर्ण माहिती असलेल्या या पुस्तकामध्ये काय वाचाल? 0 पाठीची रचना कशी असते? तिचे कार्य कसे चालते? 0 पाठीचे दुखणे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? 0 वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी? 0 पाठीचे दुखणे असेल तर काय करावे? पर्यायी उपचार कोणते? 0 पाठदुखीवर उपाय म्हणून कोणते व्यायाम करावेत? पुन्हा कधीच पाठदुखी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? 0 गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर पाठीची काळजी कशी घ्यावी? 0 बसण्याची किंवा उभे राहण्याची योग्य-अयोग्य पध्दत कोणती? योग्य खुर्ची, गादी, पादत्राणे यांची निवड कशी करावी? 0 प्रवासात आणि काम करताना कोणती काळजी घ्यावी? पाठदुखीचा त्रास टाळण्यासाठी, पाठदुखीपासून कायमची मुक्तता करण्यासाठी, तसेच तुमची पाठ लवचिक आणि निरोगी करण्यासाठी भारतातल्या दोन सुप्रसिध्द तज्ज्ञ डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिले आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 120 | 21.6 | 14 | 0.6 | 200 |
A guide for care of your back and reversing back pain
|
Health | आरोग्य | 125 | Pathdukhi_Visara.jpg | PathdukhiVisraBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.