तेहमिना दुराणी

अब्दुल सत्तार इदी यांच्या ध्वनिमुद्रित कथनाचे शब्दांकन व संकलन करून त्याला 'केवळ मानवतेसाठी' या ग्रंथरूपात साकार करणाऱ्या दुराणी यांचा जन्म १९५३ साली लाहोर येथे झाला. ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र अठरा भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.

लेखकाची पुस्तकं

केवळ मानवतेसाठी

आपलं अवघं आयुष्य मानवसेवेला समर्पित करून सेवा-केंद्रांचं अभूतपूर्व जाळं विणणार्‍या अब्दुल सत्तार इदी यांचं आत्मचरित्र


अब्दुल सत्तार इदी यांच्या ध्वनिमुद्रित कथनाचे शब्दांकन व संकलन करून त्याला 'केवळ मानवतेसाठी' या ग्रंथरूपात साकार करणाऱ्या दुराणी यांचा जन्म १९५३ साली लाहोर येथे झाला. ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र अठरा भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.

अनुवाद :
श्रीकांत लागू यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३५ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथून १९५९ साली बी.ए.(अर्थशास्त्र) ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीचे संचालक होते. मोबाईलचा शोध लागण्याच्या आधीपासून ‘माणसं जोडणं’ हे त्यांचं व्यसन होतं. कोणतीही गोष्ट पाहिली, वाचली किंवा भावली तर त्यात मित्रमंडळींना सहभागी करून आनंद वाटणं ही त्यांची वृत्ती होती. सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी रंगायन, अविष्कार व रुपवेध या संस्थांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘तुघलक’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच नभोवाणीवरील अनेक श्रुतिकांमध्येही त्यांचा सहभाग होता. विविध पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या लेखांचे संग्रही प्रकाशित झाले. 2013 साली त्यांचं निधन झालं आणि मराठीतला एक कलंदर, हरहुन्नरी लेखक हरपला.


अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…!


195.00 Add to cart