ए लाइफ इन द शॅडोज

495.00

वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याच्या जीवनातील स्मृतीचित्र


काही झालं तरी आम्ही गुप्तचर अधिकारी संत असण्यापेक्षाही पातक करणारेच अधिक असतो. आम्ही आमच्या मित्रांशी बोलत असतोच, पण त्याहीपेक्षा शत्रूशी अधिक बोलत असतो.

गुप्ततेच्या छायेत राहून दीर्घकाळ ‘आय. बी’मध्ये कार्यरत आणि पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा वाहणारे अमरजित सिंग दुलत हे सर्वश्रुत आहेत. त्यांचं हे स्मृतिचित्रपर पुस्तक म्हणजे, वाचकांसाठी अनेक अर्थाने वेगळा अनुभव होय. त्यांच्या वरील उद्धरणावरून ते लक्षात येईलच !

ए. एस. दुलत यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील काही निवडक गोष्टींसह देशात व परदेशात विविध ठिकाणी त्यांना आलेले अनुभव आणि नामांकित नेत्यांबाबतची त्यांची निरीक्षणं असं सर्वच मोठ्या रोचक पद्धतीने कथन केलं आहे.

१९८०-९०च्या दशकात काश्मीरमध्ये जहालमतवादाचं राजकारण

विकोपाला पोहोचलेलं असताना दुलत यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची ठरली आणि पुढे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात त्यांच्या सल्ल्याने काश्मीर समस्येबाबत वेगळी संवादाधारित नीती अवलंबली गेली. ‘काश्मीर मॅन’ दुलत यांनी कथन केलेले तेव्हाचे अनुभव, तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि कलम ३७० यांबाबतचं त्यांचं आगळं विश्लेषण हे सर्वच विचारप्रवृत्त करणारं असं आहे.

ते म्हणतात, ‘साध्य-साधनाचा विचार करता, काश्मीरने मला शिकवलेल्या महत्त्वाच्या आणि क्रूरकठोर धड्यांपैकी पहिला धडा म्हणजे, उद्देश साध्य करण्यासाठी बंदूक हे नेमका उलट परिणाम निष्पन्न करणारं साधन ठरतं.

एक आगळी जीवनकहाणी वाचण्याचा अनुभव… ए लाइफ इन द शॅडोज.


 

Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.