स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन
कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!
गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…
एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च
अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.
बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.
मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !
Reviews
There are no reviews yet.