250.00

द झीरो-कास्ट मिशन


भारतीय पोलीस सेवेत अधिकारी असलेले अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी काम केलेलं आहे. त्यातही त्यांनी रॉसाठी खासकरून काम केलं आहे. २००५ साली ते भारताच्या या महत्त्वाच्या तांत्रिक इंटेलिजन्स सर्व्हिसचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी या काळात त्यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे कथा लिहिण्यास सुरुवात केली. परदेशामध्ये काम करताना एजन्ट्स तसंच हेरांना कोणत्या समस्या, अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि आपलं काम पूर्ण केल्यानंतर त्यांना किती आनंद होतो हे वाचकांना कळावं म्हणून त्यांनी या कथा लिहिल्या. या माध्यमातून त्यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांच्या कहाण्यांना प्रकाशात आणलं, देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या जिवाची बाजी लावूनदेखील त्या सहकाऱ्यांना कधीही म्हणावी तेवढी प्रतिष्ठा व प्रकाशझोत लाभला नाही.

अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.


द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !


लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.


Reading Time: 1 Minutes (124 words)

978-93-92374-19-7 The Zero Cast Mission द झीरो-कास्ट मिशन Amar Bhushan अमर भूषण प्रणव सखदेव द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल?
मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !
Papar Back Book Rohan Prakashan मराठी कथासंग्रह २५०

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.