978-93-92374-19-7 | Terror in islambad | टेरर इन इस्लामाबाद | Amar Bhushan | अमर भूषण | प्रणव सखदेव | टेरर इन इस्लामाबाद पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो . वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं . तो ते फार सावधपणे पार पाडत असतो… आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं , माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ?थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद ! |
Papar Back | Book | Rohan Prakashan | मराठी | कथा | २०० |
द इंग्लिश टीचर
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
व्यवसायाने शिक्षक असणार्या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्नी-पत्नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल…
Reviews
There are no reviews yet.