प्रणव सखदेव

मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

लेखकाची पुस्तकं

कलामांचं बालपण


[taxonomy_list name=”product_author” include=”510″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती !
अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी.
अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,
आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती,
स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती…
बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातील
हे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात.
त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.
एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं…
कलामांचं बालपण !



100.00 Add to cart

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्‍या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!


250.00 Add to cart

माझा भारत… उज्ज्वल भारत

युवकांसाठी प्रेरणादायी भाषणं


[taxonomy_list name=”product_author” include=”576″]
सहलेखक :[taxonomy_list name=”product_author” include=”510″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


२७ जुलै २०१५… याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच!
कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्‍यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत…उज्ज्वल भारत !



195.00 Add to cart

स्मार्टपणे व्हा कॅशलेस

आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !



125.00 Add to cart

मिशन इंडिया

तरुणांसाठी विकसित भारत एक ध्येय


[taxonomy_list name=”product_author” include=”576″]
सहलेखक : [taxonomy_list name=”product_author” include=”577″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या
तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे.

तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया’चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं!
हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे.
भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं… सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक…मिशन इंडिया !



150.00 Add to cart
1 2