फॉन्ट साइज वाढवा

बुधवार सकाळ, लक्षद्वीप

…मारवान जेव्हा मालवाहू जहाजातून अपहरण केलेल्या जहाजापाशी पोचला होता, तेव्हा त्या सोमाली लोकांनी पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाच्या पाकिटांची खोकी मालवाहू जहाजावरून क्रूझवर उतरवली होती. कामगिरीच्या पुढच्या टप्प्याकडे जायच्या सूचना मिळेपर्यंत त्यांना आणि अपहृत लोकांना हा साठा उपयोगी पडणार होता.
“कामगिरीचा पुढचा टप्पा काय असणार आहे?” मार्कोने विचारलं होतं.
“वेळ आली की सांगेन, मार्को,” मारवान आपल्या मास्कच्या आडूनच म्हणाला होता.
मार्कोने आपल्या दोन लोकांना सभागृहातल्या सहा अपहृत प्रवाशांकरता दिवसातून दोनदा खाणं आणि पाणी नेण्याचं काम दिलेलं होतं. अन्न आणि पाणीसाठा स्वयंपाकघरात साठवलेला होता. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांतला एक जण एक ट्रे भरून खाली सभागृहात नेत असे.

त्या दिवशी ऑस्कर नावाच्या सोमालीकडे हे काम होतं. स्वयंपाकघराकडून तो सभागृहाकडे निघाला तेव्हा तो प्रचंड कंटाळलेला होता. फार काही न करता त्याला चांगले पैसे मिळत होते, कारण प्रवाशांपैकी सगळे आज्ञाधारकपणे वागत होते. कोणी हिरोगिरी करून काही गडबड करायचा प्रयत्न केलेला नव्हता. पण मार्कोने त्याला युनियन लीडरसारखं वागणाऱ्या त्या तरुणावर बारीक नजर ठेवायला सांगितलं होतं.
खरंतर, दिवसातला बराच वेळ आपण या लोकांना पाळणाघरासारखंच सांभाळतोय आणि त्याचेच आपल्याला पैसे मिळतायत, असं जिना उतरताना ऑस्करच्या मनात आलं. ही काही वाईट गोष्ट नव्हती. फक्त हे काम फार कंटाळवाणं होतं. त्याने जगभरात युद्धं चालू असलेल्या अनेक ठिकाणी बरीच वर्षं काम केलेलं होतं. त्यामानाने हे काम अगदीच सोपं असलं, तरी त्याच्यासारख्या अनुभवी युद्धकुशल माणसावर काहीही न करता दिवसेंदिवस असं बसून राहण्याने परिणाम झाला होताच.

सभागृहाच्या दारापासून काही अंतरावर त्याचे दोन बंदूकधारी साथीदार आळसावून उभे होते. बंदुका खांद्याला लटकवून ते गप्पा मारत होते. खरंतर त्यांनी दाराच्या दोन बाजूंना उभं असणं अपेक्षित होतं. पण जसजसे दिवस जात होते तसतसे ते अधिकाधिक सैलावले होते आणि कामचुकार झाले होते. ऑस्करने त्यांना दोष दिला नाही. त्यांचं काम फारच एकसुरी होतं आणि तसंही आतमध्ये फक्त सहा नि:शस्त्रं माणसं होती आणि त्यांतही दोन बायका होत्या. शिवाय त्या सभागृहातून बाहेर पडायला फक्त एकच दार होतं आणि कोणीही बाहेर पळायचा प्रयत्न केला असता, तर ते पाच पावलं जायच्या आत त्यांच्यावर गोळ्या झाडता आल्या असत्या.
सभागृहाच्या आत विक्रांत आणि डॅनियलने अर्धपारदर्शक दारांमधून पहारेकऱ्यांच्या आकृत्यांचं नीट निरीक्षण केलं होतं आणि ते साधारण कधी आणि कशा हालचाली करतात ते त्यांना समजलं होतं. यावरूनच त्यांनी त्यांची योजना आखली होती. हकिमीने विरोध केला होता, पण त्यांनी त्याला जुमानलं नव्हतं.

ऑस्करची आकृती येताना दिसताच डॅनियल पुटपुटला, “आता!” आणि विक्रांतने त्याच्या हातातला लायटर पेटवला.
सभागृहाच्या भिंतींवर समुद्री व्यापाराची आणि सफरींची चित्रं टांगलेली होती. त्या सगळ्या चित्रांना लाकडी चौकटी होत्या. डॅनियल आणि विक्रांतने सगळीच्या सगळी चित्रं भिंतींवरून खाली काढली होती आणि मध्यभागी गोळा केली होती. ही योजना फारच धोकादायक होती, पण मॅडमॅन डॅनिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच होती !

विक्रांतने लायटरने तो ढीग पेटवून दिला आणि क्षणार्धात त्या चित्रांनी पेट घेतला. ऑस्करने दोनपैकी एक दार सरकवलं तेव्हा दाराला लागूनच ठेवलेल्या त्या ढिगाची आग पूर्ण भडकली होती.
“काय चाल्लंय?!!” ऑस्कर ओरडला. त्याने हातातला ट्रे खाली टाकला आणि तो बंदूक काढू लागला. पण त्याला क्षणभर उशीर झाला. त्याच्या उजव्या हाताला खाली वाकून लपलेल्या डॅनियलने ऑस्करच्याच बुटापाशी खोचलेला सुरा उपसला. धुरामुळे ऑस्करला नीट दिसत नव्हतं. तो आपली बंदूक घेणार इतक्यात डॅनियलने तो सुरा त्याच्या गळ्याजवळच्या सगळ्यात मोठ्या शिरेमध्ये खुपसला.
ऑस्करच्या ओरडण्याने आणि धुराच्या वासाने बाहेरचे दोन पहारेकरी दाराच्या दिशेने धावतच आले. डॅनियलने ऑस्करच्या गळ्यात रुतलेला सुरा बाहेर काढला आणि त्यांच्या दिशेने फेकला. तो त्यांतल्या एकाच्या डोळ्यात घुसला. तो त्याच्या मागे असलेल्या बंदूकधाऱ्याच्या अंगावर कोसळला आणि या गोंधळाचा फायदा घेऊन विक्रांत पुढे धावला.
“त्यांच्याशी कुस्ती करायचा प्रयत्न करू नकोस,” डॅनियलने त्याला आधीच सांगून ठेवलं होतं, “ते तुझ्यापेक्षा जास्त प्रशिक्षित, जास्त शक्तिवान आणि वेगवान आहेत. संधी मिळताच त्यांना मारून टाक.”
विक्रांतने डॅनियलच्या सांगण्याप्रमाणेच केलं. खाली पडलेल्या पहारेकऱ्याच्या डोळ्यातला सुरा उपसून त्याने उठायच्या प्रयत्नात असलेल्या दुसऱ्यावर झडप घातली. अंगातली होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून त्याने त्या सोमालीच्या थोरॅक्समध्ये म्हणजे छातीत मध्यभागी तो सुरा खुपसला. त्या पहारेकऱ्याने विक्रांतचा चेहरा नखांनी ओरबडायला सुरुवात केली, पण विक्रांत हलला नाही. त्या सोमालीची हालचाल थंडावेपर्यंत तो सुरा त्याने दाबून धरला.
डॅनियल विक्रांतच्या मागोमाग बाहेर आला आणि दोघांनी मिळून त्या दोन्ही पहारेकऱ्यांचे मृतदेह आत ओढून आणले. आदल्या रात्री त्यांनी सभागृहात मिळेल ती बादली आणि बाटल्या पाण्याने भरून ठेवल्या होत्या. विक्रांत आणि डॅनियलने दारे सरकवून बंद केली, तोवर हकिमी, वैशाली, साहीर आणि प्राजक्ता यांनी ते पाणी आगीवर ओतून ती विझवून टाकली.
डॅनियलने ऑस्करच्या अंगावरची सगळी शस्त्रं आणि गोळ्या काढून स्वत:कडे घेतल्या. विक्रांतनेही एका पहारेकऱ्याची शस्त्रं घेतली. मग तिसऱ्या बंदूकधाऱ्याकडचा दारूगोळा त्यांनी अर्धा अर्धा वाटून घेतला.
“ते बघा!” अचानक वैशाली ओरडली, तसं डॅनियल आणि विक्रांतने वर पाहिलं. आणखी दोन बंदूकधाऱ्यांच्या आकृत्या त्यांना दाराच्या दिशेने येताना दिसल्या. त्यांना हा धोका पत्करावाच लागणार होता. सभागृहाच्या दाराबाहेर जरी दोनच पहारेकरी असले, तरी संपूर्ण क्रूझ जहाजावर इतरजण पसरलेले असणारच होते, आणि त्यांतले काहीजण तरी जवळपास असण्याची शक्यता होतीच. काहीतरी गडबड झाल्याचं त्यांना समजू शकणार होतं. पण डॅनियल आणि विक्रांतने हा धोका पत्करून आपली योजना अमलात आणायची ठरवलं होतं.
त्यांतल्या एकाने दोनपैकी एक दार सरकवायला सुरुवात केली, तोच डॅनियलने दारातून त्याच्यावर गोळी झाडली. दुसऱ्याचीही आकृती स्पष्ट दिसत होती आणि त्याच्यावरही डॅनियलने गोळी झाडली. डॅनियलने पटकन आधी मारलेल्यातल्या तिसऱ्या सोमालीकडचं पिस्तूल हकिमीच्या हातात दिलं. “गरज पडलीच तर असू दे,” तो म्हणाला. मग रात्री पुन्हा पुन्हा सराव करून ठरवल्यानुसार ते सगळे भराभर ओळीत उभे राहिले…

  • इलेव्हन्थ अवर
  • लेखक : एस. हुसेन झैदी
  • अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१


खिळवून ठेवणारं थ्रिलर…

Eleventh Hour

इलेव्हन्थ अवर

मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.
दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारिष्ट्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी!
अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास…

250.00Add to cart


लक्षणीय रहस्यकथा

अगस्ती इन अॅक्शन संच

३ थ्रीलर्स…


श्रीकांत बोजेवार


रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’


360.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा – ‘ब्लॅक’ संच

४ कथासंग्रहात एकूण १२ रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

 

१. अनुबिसचं रहस्य + ३ कथा
२. चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा
३. टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा
४. केदारनाथची किमया + २ कथा560.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच

४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!600.00 Add to cart

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : अशोक जैन


दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!1,100.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *