sahitya: Abhijat ani Lokpriya | साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय | vinayak | डॉ. विनायक गंधे | डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे. डॉ. द. दि. पुंडे | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 160 | lalit | ललित | 240 |
असाही पाकिस्तान
साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान…
पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली.
पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात् ‘असाही पाकिस्तान!’
– कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून
Reviews
There are no reviews yet.