डॉ. विनायक गंधे

डॉ. विनायक नारायण गंधे एम.ए., पीएच.डी.

मराठीचे निवृत्त प्राध्यापक, डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण, जि. रत्नागिरी.

■ ग्रंथलेखन :

→ एकच प्याला समीक्षापर्व (डॉ. मु. श्री. कानडे प्रकाशन) पुरस्कार : ग्रंथोत्तेजक पुरस्कार - पुणे; कोकण मराठी साहित्य पुरस्कार

एकच प्याला : मराठी साहित्याचे वैभव → लंपनचं भावविश्व (प्रकाश नारायण संत यांच्या कथांचा अभ्यास)

मराठी अनिवार्य (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यास क्रमावरील क्रमिक पुस्तक)

मराठी लेखन आणि व्याकरण

■ संपादित ग्रंथ :

सोपानदेवी (संत सोपानदेवकृत समश्लोकी गीता) (सहकार्याने) डॉ. कल्याण काळे लिखित 'संत साहित्य : अलक्षित आणि दुर्लक्षित

हंसराज स्वामीकृत 'तत्त्वझाडा' (मुख्य संपादक : डॉ. कल्याण काळे) मराठी वाङ्मय : इतिहास आणि भूगोल (डॉ. द.दि. पुंडे यांच्या निवडक प्रस्तावना आणि उपसंहार)

लेखकाची पुस्तकं

साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय

डॉ. विनायक गंधे


डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे.
डॉ. द. दि. पुंडे



 

240.00 Add to cart