978-93-92374-91-3 | Manasamjhavan | मनसमझावन | या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.
एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे. डॉ. नीतीन रिंढे |
Papar back | book | Rohan Prakashan | Marathi | 255 | mohor | fiction | कादंबरी | 375 |
द बॅचलर ऑफ आर्ट्स
अनुवाद :
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
‘प्रेम’ या भावनेचा खर्या अर्थाने विचार करायला लावणारी ही कथा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा चंद्रन या कथेचा नायक. आर.के. नारायण यांनी प्रेमात आकंठ बुडालेला चंद्रन आणि प्रेमभंगानंतरचा भरकटत जाणारा चंद्रन हा विरोधाभास खूपच सुंदर रेखाटला आहे. ‘प्रेम म्हणजे काय?’ याचा साक्षात्कार करून देणार्या अनेक घटना व प्रसंग या कादंबरीत वाचायला मिळतील. अल्लड व स्वच्छंदी आयुष्य जगणारा हा नायक ‘प्रेम’ या मृगजळामागे धावतो, ती गोष्ट मिळत नाही तेव्हा विरक्त, संन्यासीही होतो. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे जिवंत व्यक्तिरेखा, आशयसंपन्न कथेचा गाभा आणि हळुवार व मार्मिक विनोदशैली हे सर्व या कादंबरीतही प्रत्ययास येते.
Reviews
There are no reviews yet.