रामचंद्र गुहा
भारतातले ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी येल, स्टॅनफोर्ड आणि ऑस्लो या विद्यापीठांमधून तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पर्यावरणाचा इतिहास, भारतीय क्रिकेटचा सामाजिक इतिहास, भारतीय लोकशाही यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी मूलभूत लेखन केलं आहे. त्यांच्या पुस्तकांचे आणि निबंधांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने सर्वोत्तम नॉन फिक्शन भारतीय लेखक म्हणून त्यांना नावाजलं होतं. तसंच ‘टाइम’ मासिकाने त्यांची भारतीय लोकशाहीचा सर्वांत नामवंत इतिहासकार असं म्हणून नोंद घेतली होती. आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित केलं असून २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आलं.