सानिया

सानिया यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५२ रोजीचा, सांगली इथला. त्या मुंबई विद्यापीठातून एम.कॉम झाल्या आणि नॅशनल लॉ स्कूल, बंगळुरू येथून त्यांनी मानवाधिकार कायदा पदविका संपादन केली. मराठी साहित्यात त्या सिद्धहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जातात. आजपर्यंत त्यांचे चौदा कथासंग्रह, चार कादंबऱ्या आणि दोन ललितसंग्रह प्रकाशित आहेत. हिंदी, कन्नड, उर्दू, जर्मन आणि इंग्रजी भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्या नाटिका, दूरदर्शन मालिका अशा स्वरूपात रूपांतरित झाल्या आहेत. त्यांच्या साहित्याला मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, विभावरी पाटील पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार आणि ग.दि.मा पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांचा समावेश होतो. गेली पंचवीस वर्ष त्या स्वयंसेवी समुपदेशक व प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

कथासंग्रह: शोध, प्रतीती, खिडक्या, दिशा घराच्या, ओळख, भूमिका,
वलय, प्रयाण, परिमाण, ओमियागे, अशी वेळ, संपादित सानिया, पुन्हा एकदा, सुरवातीचे दिवस

ललित: प्रवास वाटा आणि मुक्काम (सहलेखन)

कादंबरी: स्थलांतर, आवर्तन, अवकाश, निरंतर वाटेवर

लेखकाची पुस्तकं

काही आत्मिक… काही सामाजिक


सानिया


लेखक जसजसे आपल्याला आवडू लागतात तसतसे त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल, विचारशैलीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीबद्दल, अनुभवांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बळावते. खरं तर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून आपल्याला ते लेखक उलगडत असतात पण त्यांनीच जर त्यांच्या वैचारिक, भावनिक घुसळणीविषयी अनौपचारिक काही लिहिलं तर वाचकासाठी चार चाँदच!

सानिया यांनी गेल्या तीस वर्षात विविध विषयांवर आणि विविध निमित्ताने लिहिलेले असे काही लेख या लेखसंग्रहामध्ये समाविष्ट केले आहेत. पुस्तक साकारताना त्यातील काही लेखांचे पुनर्लेखन केले आहे. यात काही वैचारिक लेख आहेत, तर काही चिंतनपर… काही व्यक्तीचित्रणं, तर काही लेख म्हणजे लेखिकेने स्वतःशी केलेला निखळ संवाद… तर काही आहेत निव्वळ आठवणी! एखादा लेख समाजशास्त्र विशेषज्ञाने लिहावा इतक्या गंभीर धाटणीचा, तर प्रिय मैत्रीण गौरी हिला लिहिलेला लेख डोळ्यात अश्रू उभा करणारा! नामवंत लेखक मिलिंद बोकील यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना पुस्तकात मोलाची भर घालते. खरं तर ही प्रस्तावना इतकी सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे की तिला समीक्षाच म्हणावं.

वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखिका सानिया सहज साधलेल्या संवादातून, वाचकांसोबत एक नवं नातं निर्माण करून त्यांना या लेखन प्रवासात सहप्रवासी करतात.

एका आत्मिक व्यक्तित्वाची ओळख करून देणारा ललित लेखसंग्रह काही आत्मिक… काही सामाजिक


 

375.00 Add to cart