375.00

काही आत्मिक… काही सामाजिक

सानिया

लेखक जसजसे आपल्याला आवडू लागतात तसतसे त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल, विचारशैलीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीबद्दल, अनुभवांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बळावते. खरं तर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून आपल्याला ते लेखक उलगडत असतात पण त्यांनीच जर त्यांच्या वैचारिक, भावनिक घुसळणीविषयी अनौपचारिक काही लिहिलं तर वाचकासाठी चार चाँदच!

सानिया यांनी गेल्या तीस वर्षात विविध विषयांवर आणि विविध निमित्ताने लिहिलेले असे काही लेख या लेखसंग्रहामध्ये समाविष्ट केले आहेत. पुस्तक साकारताना त्यातील काही लेखांचे पुनर्लेखन केले आहे. यात काही वैचारिक लेख आहेत, तर काही चिंतनपर… काही व्यक्तीचित्रणं, तर काही लेख म्हणजे लेखिकेने स्वतःशी केलेला निखळ संवाद… तर काही आहेत निव्वळ आठवणी! एखादा लेख समाजशास्त्र विशेषज्ञाने लिहावा इतक्या गंभीर धाटणीचा, तर प्रिय मैत्रीण गौरी हिला लिहिलेला लेख डोळ्यात अश्रू उभा करणारा! नामवंत लेखक मिलिंद बोकील यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना पुस्तकात मोलाची भर घालते. खरं तर ही प्रस्तावना इतकी सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे की तिला समीक्षाच म्हणावं.

वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखिका सानिया सहज साधलेल्या संवादातून, वाचकांसोबत एक नवं नातं निर्माण करून त्यांना या लेखन प्रवासात सहप्रवासी करतात.

एका आत्मिक व्यक्तित्वाची ओळख करून देणारा ललित लेखसंग्रह काही आत्मिक… काही सामाजिक

Paper Back 252 ,
Share
Kahi Atmik kahi samajik काही आत्मिक काही सामाजिक सानिया लेखक जसजसे आपल्याला आवडू लागतात तसतसे त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल, विचारशैलीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीबद्दल, अनुभवांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बळावते. खरं तर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून आपल्याला ते लेखक उलगडत असतात पण त्यांनीच जर त्यांच्या वैचारिक, भावनिक घुसळणीविषयी अनौपचारिक काही लिहिलं तर वाचकासाठी चार चाँदच!

सानिया यांनी गेल्या तीस वर्षात विविध विषयांवर आणि विविध निमित्ताने लिहिलेले असे काही लेख या लेखसंग्रहामध्ये समाविष्ट केले आहेत. पुस्तक साकारताना त्यातील काही लेखांचे पुनर्लेखन केले आहे. यात काही वैचारिक लेख आहेत, तर काही चिंतनपर… काही व्यक्तीचित्रणं, तर काही लेख म्हणजे लेखिकेने स्वतःशी केलेला निखळ संवाद… तर काही आहेत निव्वळ आठवणी! एखादा लेख समाजशास्त्र विशेषज्ञाने लिहावा इतक्या गंभीर धाटणीचा, तर प्रिय मैत्रीण गौरी हिला लिहिलेला लेख डोळ्यात अश्रू उभा करणारा! नामवंत लेखक मिलिंद बोकील यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना पुस्तकात मोलाची भर घालते. खरं तर ही प्रस्तावना इतकी सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे की तिला समीक्षाच म्हणावं.

वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखिका सानिया सहज साधलेल्या संवादातून, वाचकांसोबत एक नवं नातं निर्माण करून त्यांना या लेखन प्रवासात सहप्रवासी करतात.

एका आत्मिक व्यक्तित्वाची ओळख करून देणारा ललित लेखसंग्रह काही आत्मिक… काही सामाजिक

Papar back book Rohan Prakashan Marathi 255 मोहोर 375

Weight 630 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.