आशिष काळकर

आशिष काळकर : २००५ साली मुंबई विद्यापीठातून वास्तुविशारद पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. २००६ सालापासून भारत, आखाती देश, सिंगापूर, ओमान अशा अनेक देशांमधल्या वेगवेगळ्या प्रकल्पांवरचा कामाचा अनुभव. आंतरराष्ट्रीय कन्सल्टन्सी कंपन्यांच्या कामाच्या निमित्ताने चीन, युरोप, आशिया, आखाती देश अशा अनेक ठिकाणी भटकंतीचा अनुभव.२०१६ सालापासून ब्लॉगच्या माध्यमातून ललितलेख, स्वानुभवावर आधारित व्यक्तिचित्रणं, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय विषय, भटकंतीचे अनुभव अशा विविध विषयांवर लिखाण. रोहन प्रकाशनच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं 'अरबस्तानच्या अनवट वाटा' हे प्रवासवर्णनात्मक सदर.आखाती देशांमधल्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्याच्या निमित्ताने ऊर्जा व्यापार, या व्यापाराच्या अनुषंगाने चालत असलेलं राजकारण आणि आखाती देशांची भू-राजकीय परिस्थिती या विषयांचा सखोल अभ्यास.

ईमेल - ashish.kalkar1982@gmail.com

लेखकाची पुस्तकं

Featured

युक्रेन युद्ध


आशिष काळकर


लेखक आशिष काळकर यांनी या पुस्तकात रशिया-युक्रेन लढा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडून युद्धाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी विस्तृतपणे चितारली आहे. त्यांनी युक्रेनच्या आजपर्यंतच्या इतिहासाचे माहितीपूर्ण विवेचन करून हा संघर्ष जागतिक ऊर्जा स्पर्धेशी कसा निगडित आहे,   हा महत्त्वाचा पैलू चर्चिला आहे. दोन्ही पक्षांनी शांततापूर्ण मार्ग अनुसरुन संवादातून वादग्रस्त प्रश्न सोडवावेत अशी समतोल भूमिका भारताने घेतली आहे. या युद्धाच्या अनुषंगाने भारताचे भूराजकीय महत्त्व     वाढीस लागल्याचं दिसून येतं. या गंभीर संघर्षावरील हे पुस्तक जसं समयोचित आहे तसंच ते उद्बोधकही ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
– सुधीर देवरे
(भारताचे युक्रेनमधले पहिले राजदूत व माजी सचिव, विदेश मंत्रालय, नवी दिल्ली)
संपूर्ण जगावर परिणाम करणार्‍या युक्रेन युद्धाचा उगम, अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे मानस, युक्रेनला स्वतंत्र ठेवण्यासाठी अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांनी चालविलेला निकराचा लढा आणि त्या निमित्ताने सुरू असलेली ऊर्जास्रोतांची खेळी इत्यादी विषयांचा या पुस्तकात लेखक आशिष काळकर यांनी घेतलेला धांडोळा खिळवून ठेवतो. त्यात इतिहासाचे निरनिराळे भू-व्यूहात्मक पदर काळकर यांनी उलगडून दाखवले आहेत. त्याच बरोबर अमेरिका, युरोप व नाटो संघटनेने रशियाच्या विघटनानंतर युरोपीय महासंघाचा झपाट्याने केलेला विस्तार पुतीन यांची झोप उडविणारा कसा ठरला, याचाही आलेख उत्तमरीत्या मांडला आहे. रशियाला सोव्हिएत काळातील पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचे पुतीन यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का? ऊर्जास्रोतांसाठी जग    इतर काही पर्याय शोधेल का? अशा महत्त्वाच्या प्रश्नांचाही वेध काळकर यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे.   एकंदर विषयाची मांडणी स्तुत्य व अभिनंदनीय आहे.
– विजय नाईक

(आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात अनेक वर्षं कार्यरत असलेले दिल्लीस्थित पत्रकार)



300.00 Add to cart

मोसाद मिशन्स

आशिष काळकर


काटेकोर नियोजन, चतुर, चौकस व देशाशी एकनिष्ठ असलेली हेरयंत्रणा आणि धूर्त, चलाख नेतृत्व यांच्या जोरावर ‘मोसाद’ने तिच्या निर्मितीपासून अशक्य वाटणाऱ्या अनेक मोहिमा तडीस नेल्या. या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आशिष काळकर यांनी मोसादच्या अशा काही निवडक नाट्यमय मोहिमांचं अथपासून इतिपर्यंत विस्तृत गोष्टीरूप कथन केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मोसादच्या यशस्वी मोहिमांबरोबरच, अयशस्वी मोहिमांचाही आढावा घेतला आहे. याशिवाय इस्त्रायल देशाची स्थापना, मोसादची निर्मिती, तिची गरज अशी पार्श्वभूमीही सांगितली आहे. त्यामुळे मोसादची यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेण्यास मदत होते. पुस्तकात शेवटी, काळकर यांनी इस्त्रायल-हमास संघर्षाचा इतिहास थोडक्यात सांगून २०२३च्या इस्त्रायल-हमास युद्धामध्ये मोसादने निभावलेली भूमिका विशद केली आहे जगातल्या भल्या भल्या देशांना धडकी भरवणाऱ्या आणि काही वाट्टेल ते झालं तरी हाती घेतलेलं काम पार पाडणाऱ्या एका गुप्तचर यंत्रणेच्या कहाण्या… मोसाद मिशन्स !

240.00 Add to cart