डॉ. राजेंद्र बर्वे

डॉ राजेंद्र बर्वे यांनी एल. टी. एम. मेडिकल कॉलेज, सायनमुंबई येथून पहिल्या क्रमांकासह एम.डी.ची पदवी प्राप्त केलीगोडा मेडिटेशन सेंटर, कोलंबो, श्रीलंका येथून भन्ते ओलाआनंदा यांच्या हस्ते त्यांना 'माइंडफुलनेस टीचर' (सुगत आचार्यही पदवी प्रदान करण्यात आली. पाश्चात्त्य वैद्यकीय विज्ञान पटकआणि पौर्वात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य संगम साधून माइंडफुलनेसअर्थात पूर्णभान या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानंदिली आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशातीलविविध कार्यशाळा आणि परिषदांमधून त्यांनी 'न्यूरो सायन्स','मानसिक आरोग्य' आणि 'समग्र आरोग्य विचार' या विषयांवरतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केलं आहे. कतार इथे एका मोठ्याकंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी माइंड लनेस या विषयावर त्यांनीकार्यशाळा घेतली असून, लंडन येथील एका खासगी वाहिनीसाठीमाइंडफुलनेस विषयावर मुलाखतही दिली आहे.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जनजागृती केल्याबद्दल'ट्रान्स आशियन अॅवॉर्ड', 'आरोग्य ज्ञानेश्वर' आणि 'शतायुषी

हे बहुमान त्यांना प्राप्त झाले आहेत.मानसिक आरोग्य संदर्भात डॉ. बर्वे यांनी अनेक अभ्यासपूर्णपुस्तकं लिहिली असून विविध वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमधून सदरही लिहिली आहेत.

मोबाइल : ९८२००२३०१४
Email: drrajendrabarve@gmail.com

लेखकाची पुस्तकं

का चिंता करिशी

चिंतामुक्तीसाठीचा हमखास मार्ग


डॉ.राजेंद्र बर्वे


सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.

आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.

ताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.

डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.

या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.

त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.

हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल…
का चिंता करिशी ?

 

200.00 Add to cart

माइंडफुलनेस

वर्तमानक्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना.


डॉ.राजेंद्र बर्वे


सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची!

पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुधार्य डॉ. राजेंद्र बर्वे.

आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.



200.00 Add to cart