395 | 978-93-86493-65-1 | Nehru Va Bose : samantar Jeevanpravas | नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास | Rudrangshu Mukherjee | रुद्रांग्शू मुखर्जी | Avdhoot Dongare | अवधूत डोंगरे | `जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’, असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो’, असे उदगार नेहरूंनी का काढले? स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते. आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी… नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास ! |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 262 | 21.5 | 14 | 1.5 | 320 | Political | राजकीय | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | 350 | Nehru_BoseCover | Nehru_BosecoverBC.jpg |
हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान
एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत
नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!