170.00

आरोग्यदायी जीवनसत्त्वे

उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण


एक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.

अनुवाद : 
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अ‍ॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.


, 978-81-86184-66-0 Paper Back 168 ,

Reading Time: 1 Minutes (138 words)

27 978-81-86184-66-0 Aarogyadayi Jeevansatve आरोग्यदायी जीवनसत्त्वे उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण Hari Krushna Bakhru हरी कृष्ण बाखरू Dr. Arun Mande डॉ. अरुण मांडे आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अ‍ॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा…
ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे.
भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 168 21.6 14 0.7 160
Healthy Nutrients
Health आरोग्य 100 Aarogyadayi jeevansatve.jpg AarogyadaiJeevansatweBC.jpg
Weight 160 g
Dimensions 21.6 × 14 × 0.7 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.