58 | Yogasane Mulansathi | योगासने मुलांसाठी | Dr. Suresh Bhamre | डॉ. सुरेश भामरे | योगासनांमुळे शरीर निकोप राहते, तसेच मानसिक संतुलन आणि मनाची एकाग्रता राखण्यासही त्यांची मदत होते. योगासनांना लहानपणापासूनच सुरुवात करणे म्हणजे ओल्या मातीला योग्य वेळी योग्य आकार देणे म्हणूनच या पुस्तकात मुलांचा विचार करून योगासनांच्या काही कृती छायाचित्रांसह दिल्या आहेत. सुस्पष्ट छायाचित्रांमुळे योगासने त्यातील बारकाव्यांसह करण्यास मदत होईल. तसेच योगासनांचे महत्त्व, हठयोग म्हणजे काय, ध्यानसाधना कशी करावी यासंबंधी प्राथमिक माहितीही यात आहे. या पुस्तकामुळे नियमित योगासने करणे हा मुलांना कटकटीचा पिरियड न ठरता खेळाचा तास ठरू शकतो! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 120 |
yoga for children
|
Yoga | योग | 100 | Yogasane Mulansathi.jpg | YogasaneMulansathiBC.jpg |
योग सर्वांसाठी
शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार
बी.के.एस.अय्यंगार
योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं जणू व्रतच अंगिकारलं आहे. ‘योग सर्वांसाठी’ हे पुस्तक याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाच योगासनं करणं शक्य व्हावं यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट – स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी!
Reviews
There are no reviews yet.