146 | 978-93-80361-24-6 | Striyansathi Yog | स्त्रियांसाठी योग…एक वरदान | स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन | Geeta Iyengar | गीता अय्यंगार | या पुस्तकात विशेषत: स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे योगाविषयीचे व आसनांविषयीचे बारकावे सादर केले आहेत. यात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यानविषयक माहिती तंत्रासहित दिली आहे. याचा फायदा शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यास होईल त्याचप्रमाणे विविध व्याधींवर उपचार म्हणूनही होईल. योगसाधनेची दिलेली क्रमवार पध्दती हे या पुस्तकाचं वैशिष्टय होय. तसेच योग या विषयाची मांडणी, योगाच्या प्रायोगिक अंगाची विषयवार मांडणी, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ठरविलेला मार्ग या बाबतीत लेखिकेने पुस्तकात सखोल व सचित्र मार्गदर्शन केलं आहे. पुस्तकाची ठळक वैशिष्टये 0 दृढशास्त्रीय बैठक 0 अभ्यासाची क्रमवार मांडणी 0 मूलभूत दृष्टी देऊन योगतत्त्वाचा सर्वांगीण परामर्श 0 सहजपणे आत्मसात करता येण्याजोगी आसने, प्राणायाम, ध्यान यांचे तंत्र 0 क्षमतेनुसार दिलेले विविध पर्याय योगविद्या गुरूशिवाय साध्य होत नाही, पण या पुस्तकाचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर जवळजवळ प्रत्यक्ष गुरूकडून मिळेल इतकं समग्र आणि सखोल ज्ञान यातून मिळतं. यातील माहिती परिपूर्ण व अचूक आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 425 | 21.6 | 14 | 2.3 | 750 |
A complete Yoga guide for women written by Guru B K S Iyengars daughter, also a Yoga Guru.
|
Yoga | योग | 350 | Striyansathi_Yog.jpg | striyansathi yogBC.jpg |
योगोपचार
योगमहती अधोरेखित करत विविध आरोग्यसमस्या निवारणासाठी उपयुक्त मार्गदर्शन
शब्दांकन : गीता अय्यंगार
योग म्हणजे जीवन जगण्याची कला. योगाची अनेक रुपं व पैलू आपल्या जीवनाला समृद्ध करतात. त्यात जगण्यातली सहजता, मोकळेपणा, आल्हाददायकता, सचोटी आणि मनोविकास या पैलूंचा समावेश तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पैलू योगाबरोबर जोडला गेला आहे, तो म्हणजे आरोग्य!
वयानुसार उद्भवणारे शारीरिक, मानसिक विकार आणि जन्मतःच असणारे दोष, अशा दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. खरं म्हटलं तर योग ही जणू नैसर्गिक देणगीच मानवजातीला लाभलेली आहे. या दृष्टिकोनातून योगमहती सांगता सांगता लेखकाने…
■ लहानपणापासूनच स्वतःला घडवण्याचं तंत्र
■ प्रौढवयात येणारं अग्निमांद्य
■ उच्च रक्तदाब
■ मधुमेह
■ उतारवयात येणारे हृदयरोग
■ त्वचेचे विकार
■ स्त्रियांच्या आरोग्यसमस्या
… अशा अनेक आरोग्यसमस्यांवर प्रचलित योगासनांचे उपचार या पुस्तकात सुचवले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील काही साधनांचा उपयोग करून अथवा आधार घेऊन योग करण्याची क्रिया आणि कृतीही दिल्याने शारीरिक मर्यादा असणाऱ्यांनाही हे योगोपचार अतिशय सुलभतेने आणि उत्तमरीत्या साधता येतील. योगाला आयुष्य वाहिलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी मराठी माणसाच्या सोयीसाठी मराठीत साकारलेलं पुस्तक… योगोपचार !
Reviews
There are no reviews yet.