466 | 81-86184-63-X | Yoga Sarvansathi | योग सर्वांसाठी | शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार | B.K.S Iyyengar | बी.के.एस.अय्यंगार | योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं जणू व्रतच अंगिकारलं आहे. ‘योग सर्वांसाठी’ हे पुस्तक याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाच योगासनं करणं शक्य व्हावं यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट – स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी! | पेपरबॅक | Book | Rohan Prakashan | Marathi | 324 | 300 | Yog | 300 | Yoga Sarwansathi.jpg | YogSarvansathiBC.jpg |
स्त्रियांसाठी योग…एक वरदान
स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन
गीता अय्यंगार
या पुस्तकात विशेषत: स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे योगाविषयीचे व आसनांविषयीचे बारकावे सादर केले आहेत. यात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यानविषयक माहिती तंत्रासहित दिली आहे. याचा फायदा शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यास होईल त्याचप्रमाणे विविध व्याधींवर उपचार म्हणूनही होईल. योगसाधनेची दिलेली क्रमवार पध्दती हे या पुस्तकाचं वैशिष्टय होय. तसेच योग या विषयाची मांडणी, योगाच्या प्रायोगिक अंगाची विषयवार मांडणी, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ठरविलेला मार्ग या बाबतीत लेखिकेने पुस्तकात सखोल व सचित्र मार्गदर्शन केलं आहे.
पुस्तकाची ठळक वैशिष्टये
0 दृढशास्त्रीय बैठक
0 अभ्यासाची क्रमवार मांडणी
0 मूलभूत दृष्टी देऊन योगतत्त्वाचा
सर्वांगीण परामर्श
0 सहजपणे आत्मसात करता येण्याजोगी आसने, प्राणायाम, ध्यान यांचे तंत्र
0 क्षमतेनुसार दिलेले विविध पर्याय
योगविद्या गुरूशिवाय साध्य होत नाही, पण या पुस्तकाचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर जवळजवळ प्रत्यक्ष गुरूकडून मिळेल इतकं समग्र आणि सखोल ज्ञान यातून मिळतं. यातील माहिती परिपूर्ण व अचूक आहे.
Reviews
There are no reviews yet.