425 | 978-93-89458-03-9 | Yogacharya | योगाचार्य | बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र | Rashmi Palkhiwala | रश्मी पालखीवाला | Neeta Kulkarni | नीता कुलकर्णी | कर्नाटकातल्या एका लहानशा खेड्यातून बी.के.एस. अय्यंगार यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाला सुरुवात झाली. कुमारवयापासूनच त्यांना सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ कृष्णमाचार्य यांचा सहवास लाभला व त्यांच्यात गुरु-शिष्य नातं निर्माण झालं. मात्र हे गुरु-शिष्य संबंध कायमच तणावपूर्ण राहिले, तरी अय्यंगारांनी मोठ्या जिद्दीने कृष्णमाचार्यांकडून योगविद्या शिकून घेतली.
भविष्य घडवण्यासाठी पुणे शहरात आल्यावर अय्यंगारांच्या जीवनाला वेगळं वळण लाभलं. या अनोळखी शहरात जम बसवायला अय्यंगारांना बराच संघर्ष करावा लागला… जणू काही ती त्यांची आणि योगविद्येची कसोटीच होती. आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले! त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली. एवढी की, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग आणि अय्यंगार हे अतूट समीकरण तयार होऊन ‘अय्यंगार योग’ अशी जणू एक वेगळी शाखाच निर्माण झाली. अय्यंगारांनी निरामय आयुष्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवलं, विविध साधनांचा वापर सुचवून योग लोकप्रिय केला. रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र…योगाचार्य ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 212 | 22 | 14 | 1.2 | 230 | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Yoga | योग | 300 | YogacharyaCover | YogacharyaBC.jpg |
लालबहादुर शास्त्री
राजकारणातील मर्यादापुरषोत्तम
अनुवाद :
काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !
…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!
Biography of Shri.Lal Bahadur Shastri
Reviews
There are no reviews yet.