237 | 978-93-82591-25-2 | Paatanjal Yogasutre | पातंजल योगसुत्र | महर्षी पतंजली रचित योगसूत्रांची प्रारंभिक ओळख | B.K.S. Iyengar | बी.के.एस. अय्यंगार | Dr. Sameer Kulkarni | डॉ. समीर कुलकर्णी | पातंजल योगसूत्रे’ हा महर्षी पतंजलींनी सिध्द केलेला भारतीय योगपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ होय. चार पादात विभागलेल्या या ग्रंथात अष्टांग योगसाधनेची सूत्रात्मक पध्दतीने समग्र मांडणी केलेली आहे. वायु पुराणात सूत्राची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी- ‘स्वल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम्..’ अर्थात् कमीतकमी अक्षरे, मांडणीतील असंदिग्धता, विषयाच्या साराने संपृक्त असलेली रचना आणि अर्थाच्या प्रकटनासोबत अभ्यासकाला विषयविश्वाकडे अभिमुख करणे ही सूत्राची वैशिष्टये होत. व्याख्येत वर्णन केलेल्या सर्व गुणांनी ‘पातंजल योगसूत्रे’ मंडित आहेत. कोणत्याही टप्प्यावरच्या योगसाधकासाठी पातंजल योगसूत्रांचा अभ्यास आवश्यक असतो. साधनेतील प्रत्येक टप्प्यावर ही सूत्रे साधकासाठी नवा अर्थ घेऊन सामोरी येतात आणि साधकाची साधना अधिकाधिक सघन करत जातात हा या सूत्रांचा महत्त्वाचा विशेष आहे. गेली ऎंशी वर्षे योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार अप्रतिहतपणे योगसाधनेत गढलेले आहेत. त्यांच्या या दीर्घ साधनेतून त्यांना प्रतीत झालेला योगसूत्रांचा अन्वय या ग्रंथात त्यांनी अचूकपणे आणि सोप्या भाषेत योगसाधकांसाठी तसेच योगप्रेमींसाठी मांडलेला आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 175 | 21.6 | 14 | 0.9 | 240 |
Padmabhushana Dr. B. K. S. Iyengar is a living legend, a true Yoga Master and a great Yoga Sadhaka of modern times has done painstaking practice throughout his life with research bent of mind and guided many individuals in their practice of Yoga over the last more than seven decades. In this book he has explained the meaning of Yogasutra in a simple language.
|
Yoga | योग | 200 | Patanjal Yogasutre_RGB | Patanjal Yogasutre_BackBC.jpg |
शांती योग
योग साधनेची प्राथमिक,माध्यमिक आणि प्रगत वाटचाल
गीता अय्यंगार
‘योग’ हा विषय तसा अवघडच. कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे. यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत: वरच; तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी… हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही. योगामुळे जीवन जगण्या-अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते. म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला ‘योग’ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी (योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे. त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे, त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाचे वाचन, मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल.
Reviews
There are no reviews yet.