रोहन प्राइम New Layer सभासद व्हा! रोहन साहित्य मैफल वाचनानंद घ्या! रोहन प्राइम खरेदी करा

Best Marathi books, Marathi books in india, best marathi books in india, best books in india, online marathi books, online best marathibooks, online books in india

'रोहन'ची पुस्तकं जाणून घ्या...

द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट

क्रिकेट या सुसंस्कृत खेळाबरोबर असलेलं माझं आजन्म प्रेमप्रकरण
_______________________________________________________________________

रामचंद्र गुहा
अनुवाद  : अजेय हर्डीकर


भारतात गल्ली-बोळांत, छोट्या-मोठ्या मैदानांत उपलब्ध साधनांद्वारे क्रिकेट खेळलं जातं आणि हा खेळ पाहणारेही जागच्या जागी थबकून, जीव ओतून तो पाहत असतात; इतका क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या नसानसांत भिनला आहे!

क्रिकेटचा चाहता आणि काही वर्ष स्थानिक क्रिकेट खेळलेला एक खेळाडू या नात्याने ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास आत्मकथनपर शैलीत या पुस्तकात सांगितला आहे.

क्रिकेट हे त्यांचं प्रेमप्रकरण आहे, असं सुरुवातीलाच सांगून ओघवत्या व सहज-सुंदर शैलीत त्यांच्या बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी, तेव्हाचे स्थानिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्यांचे ‘हिरो’ खेळाडू, त्यांची बलस्थानं आणि मर्यादा यांबद्दल ते कथन करतात. तसंच शालेय, कॉलेज, क्लब, राज्य आणि देश अशा सर्व पातळ्यांवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचं महत्त्वही ते पुस्तकात आवर्जून विशद करतात.

पुस्तकातील शेवटच्या भागात भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियामक मंडळामध्ये नियुक्त प्रशासक म्हणून काम करताना आलेले अनुभव परखडपणे मांडून ते आजच्या बदललेल्या क्रिकेट-संस्कृतीची चिकित्साही करतात.

क्रिकेट खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या विचारवंत इतिहासकाराचं क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देणारं आणि वाचकालाही त्या काळाची सफर घडवून आणणारं प्रांजळ कथन… द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट!

450.00 Add to cart

अजब खजिना निसर्गाचा

सलीम सरदार मुल्ला


गुड्डू आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना झाडं-फुलं-पानं-पक्षी-प्राणी असा सभोतालचा सगळा निसर्ग खूप आवडतो… पण ही पोरं काही फक्त निसर्गात रमणारी नाहीत बरं का! ती सायकलवरून रपेट मारत अभ्यास-सहलीला जातात… जखमी प्राण्यांची देखभाल करतात… ‘फुलपाखरू मंडळ’ स्थापन करून माहिती गोळा करतात… आणि हो, गावातल्या तळ्यातले मासे वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढाही देतात…!

निसर्गाची अद्भुत नवलाई जपण्यासाठी झटणाऱ्या निरागस, साहसी, बुद्धिमान आणि जागरूक मुलांची कुतूहल जागृत करणारी लाघवी गोष्ट…

150.00 Add to cart

फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन


अनिल लांबा


हे पुस्तक वैयक्तिक गुंतवणूक-नियोजन, नियोजनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने, अशा भाषेत व उदाहरणं देत हे पुस्तक ‘फायनान्स’च्या विविध संकल्पना मुळातूनच समजावतं, तसेच गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे सांगत योग्य मार्गदर्शन करतं.

पुस्तकं काय समजून घेताना…?
कोणतं मार्गदर्शन करतं?

१)फायनान्सविषयी ‘बेसिक’ माहिती
२)वैयक्तिक ‘बॅलन्सशीट’ कशी कराल?
३)चक्रवाढ व्याज एक महाशक्ती
४)’शेअरमार्केट’मधील शिरकाव
५)म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
६)पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय
७)क्रिप्टोकरन्सी, मनीमार्केट, रीट ( REIT( असे नवे पर्याय
८)गृहकर्जफेडीचे विविध कंगोरे
९)आयकरातील कर सवलती
१०)प्रामाणिकपणे कर भरण्याचे फायदे

सर्वसामान्यांचं जणू एक गुंतवणूक हँडबुक…फायनान्शिअल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन.

370.00 Add to cart

दुभंगलेले जीवन


अरुणा सबाने


एखादा निर्णय चुकीचा ठरतो आणि आयुष्य हातातून पूर्णपणे निसटू लागतं… या परिस्थितीतून काही जण सावरतात तर, काही जण उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अशाच उद्ध्वस्तांची आणि सावरलेल्यांचीही…

अनूला तिचं लग्न झाल्यानंतर कळत, तिचा नवरा शरद समलैंगिक आहे…. तिचं संपूर्ण भावविश्वच कोसळू लागतं… आणि पुढे आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यांची मुलगी सुचिता बापावरचा हा ‘ठपका’ घेऊन सासरी कायम जाच सहन करत राहते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या लढाईत एका वळणावर मानसिक आजाराची बळी ठरते. मात्र, शलाका तिला एक खंबीर साथ देते आणि त्यातून तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळतं… ती सावरते.

हे झालं कादंबरीचं कथासूत्र. पण या कादंबरीतून लेखिका अरुणा सबाने जो कळीचा प्रश्न उभा करतात, तो म्हणजे समलैंगिकता समाजमान्य असती तर, अनू काय किंवा शरद काय किंवा सुचिता काय… या तिघांच्याही आयुष्याची होरपळ वाचली नसती का? समलैंगिकता आणि मानसिक आजार अशा आजच्या महत्त्वाच्या समस्यांवर आणि निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर थेट पण संयत भाषेत चर्चा करणारी कादंबरी दुभंगलेले जीवन.


 

395.00 Add to cart

काही आत्मिक… काही सामाजिक


सानिया


लेखक जसजसे आपल्याला आवडू लागतात तसतसे त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल, विचारशैलीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीबद्दल, अनुभवांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बळावते. खरं तर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून आपल्याला ते लेखक उलगडत असतात पण त्यांनीच जर त्यांच्या वैचारिक, भावनिक घुसळणीविषयी अनौपचारिक काही लिहिलं तर वाचकासाठी चार चाँदच!

सानिया यांनी गेल्या तीस वर्षात विविध विषयांवर आणि विविध निमित्ताने लिहिलेले असे काही लेख या लेखसंग्रहामध्ये समाविष्ट केले आहेत. पुस्तक साकारताना त्यातील काही लेखांचे पुनर्लेखन केले आहे. यात काही वैचारिक लेख आहेत, तर काही चिंतनपर… काही व्यक्तीचित्रणं, तर काही लेख म्हणजे लेखिकेने स्वतःशी केलेला निखळ संवाद… तर काही आहेत निव्वळ आठवणी! एखादा लेख समाजशास्त्र विशेषज्ञाने लिहावा इतक्या गंभीर धाटणीचा, तर प्रिय मैत्रीण गौरी हिला लिहिलेला लेख डोळ्यात अश्रू उभा करणारा! नामवंत लेखक मिलिंद बोकील यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना पुस्तकात मोलाची भर घालते. खरं तर ही प्रस्तावना इतकी सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे की तिला समीक्षाच म्हणावं.

वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखिका सानिया सहज साधलेल्या संवादातून, वाचकांसोबत एक नवं नातं निर्माण करून त्यांना या लेखन प्रवासात सहप्रवासी करतात.

एका आत्मिक व्यक्तित्वाची ओळख करून देणारा ललित लेखसंग्रह काही आत्मिक… काही सामाजिक


 

375.00 Add to cart

आटपाट देशातल्या गोष्टी

 


संग्राम गायकवाड


समाजातील नीतिमत्ता कशी व्यक्त होते? एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत हे दाखवायचा एक उत्कृष्ट प्रयत्न लेखक करतो. वेगवेगळे लोक, त्यांचे आपापले दृष्टिकोन. त्यांच्या एकत्र नाचातून घडणारे समाजजीवन. उदाहरण आहे एका आयकर धाडीचे. मध्यमवर्गीयांना आवडणारी घटना. कोणी ‘मोठा’ ठेचला जातो आहे! पण असे होत नाही. कोणालाच फार समाधान न देणारे चित्र घडत जाते. उथळपणे ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून गप्प बसावे का? की जॉन स्टाइनबेकसारखे There is just stuff people do म्हणावे ?

वाचकाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देत लेखक मंद स्मित देतो!

नंदा खरे


 

395.00 Add to cart

नाकारलेला

 


विलास मनोहर


महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची स्थिती-मनःस्थिती कशी होती आणि सध्या कशी आहे?

विलास मनोहर यांनी त्यांच्या ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’ या गाजलेल्या कादंबरीतून १९७५ ते १९९० दरम्यानच्या पंधरा वर्षांच्या काळातील या नक्षलप्रवण भागातील आदिवासींच्या स्थिती-मनःस्थितीचं जिवंत चित्रण केलं. त्या कादंबरीचा ‘सीक्वेल’ अर्थात, पुढील भाग म्हणजे सदर कादंबरी ‘नाकारलेला’.

या कादंबरीतून लेखकाने पुढे १९९० च्या दशकापासून तेथील परिस्थितीत आणि नव्या पिढीच्या आदिवासींमध्ये अनेक बदल कसे घडत गेले, त्याचा वेध ‘आदिवासी-केंद्री’ दृष्टिकोनातून घेतला आहे.

लेखक स्वतः दीर्घकाळ याच भागात वास्तव्यास असल्याने त्यांनी केलेलं समीप चित्रण विश्वासार्ह ठरतं.

एकीकडे, शासनाची विकासाबाबतची बदलती धोरणं आणि दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी स्वीकारलेली लढाऊ नीती आणि या प्रक्रियेत सुरक्षादल व नक्षलवादी यांच्यामध्ये सापडलेल्या आणि सतत शकाग्रस्त, भयग्रस्त वातावरणात जगणाऱ्या सामान्य आदिवासींच्या जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण यात साधलेलं आहे. आज ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, जवान म्हणूनही भूमिका बजावणारे आदिवासी; खबरे, सावकार, पत्रकार; राजकीय नेते व ‘नक्षल दला’चे नेते आणि मूळ इथलाच पण मोठ्या शहरात सुस्थित जीवन जगणारा आधुनिक नायक लालसू अशा अनेक व्यक्तिरेखांच्या नजरेतून वस्तुस्थितीचं ३६० अंशात दर्शन घडवू पाहणारी कादंबरी “नाकारलेला


 

575.00 Add to cart

का चिंता करिशी

चिंतामुक्तीसाठीचा हमखास मार्ग


डॉ.राजेंद्र बर्वे


सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.

आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.

ताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.

डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.

या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.

त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.

हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल…
का चिंता करिशी ?

 

200.00 Add to cart

योगोपचार

योगमहती अधोरेखित करत विविध आरोग्यसमस्या निवारणासाठी उपयुक्त मार्गदर्शन


शब्दांकन : गीता अय्यंगार


योग म्हणजे जीवन जगण्याची कला. योगाची अनेक रुपं व पैलू आपल्या जीवनाला समृद्ध करतात. त्यात जगण्यातली सहजता, मोकळेपणा, आल्हाददायकता, सचोटी आणि मनोविकास या पैलूंचा समावेश तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पैलू योगाबरोबर जोडला गेला आहे, तो म्हणजे आरोग्य!

वयानुसार उद्भवणारे शारीरिक, मानसिक विकार आणि जन्मतःच असणारे दोष, अशा दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. खरं म्हटलं तर योग ही जणू नैसर्गिक देणगीच मानवजातीला लाभलेली आहे. या दृष्टिकोनातून योगमहती सांगता सांगता लेखकाने…

■ लहानपणापासूनच स्वतःला घडवण्याचं तंत्र

■ प्रौढवयात येणारं अग्निमांद्य

■ उच्च रक्तदाब

■ मधुमेह

■ उतारवयात येणारे हृदयरोग

■ त्वचेचे विकार

■ स्त्रियांच्या आरोग्यसमस्या

… अशा अनेक आरोग्यसमस्यांवर प्रचलित योगासनांचे उपचार या पुस्तकात सुचवले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील काही साधनांचा उपयोग करून अथवा आधार घेऊन योग करण्याची क्रिया आणि कृतीही दिल्याने शारीरिक मर्यादा असणाऱ्यांनाही हे योगोपचार अतिशय सुलभतेने आणि उत्तमरीत्या साधता येतील. योगाला आयुष्य वाहिलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी मराठी माणसाच्या सोयीसाठी मराठीत साकारलेलं पुस्तक… योगोपचार !


500.00 Add to cart

घर खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी पुस्तकं

Best Marathi books in india
खाली तुमचा ईमेल भरा, आमच्यासोबत जोडलेले रहा!

अपडेट्स जाणून घ्यायचेत? नवे लेख वाचायचेत?