समीर गायकवाड

समीर रावसाहेब गायकवाड सोलापूर येथे वास्तव्यास. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे मूळ गाव. शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.ए. (मराठी) उत्तीर्ण झाल्यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही प्राध्यापकी पेशा न स्वीकारता शेती, व्यवसायावर उदरनिर्वाह. विविध विषयांवर लिहिताना भिन्न साहित्यप्रकारात लेखन. विख्यात दैनिकांत, नियतकालिकांत विपुल स्तंभलेखन. सातत्यपूर्वक ब्लॉगलेखन. वेश्यांच्या जीवनाचे अप्रकाशित पैलू समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न, संलग्न माहिती विविध सरकारी यंत्रणांना पुरवतानाच या समस्येकडे समाजाचे भान वळवण्यासाठी समाज माध्यमांत हेतूतः लेखन. साहित्यनिर्मिती करत असतानाच सामाजिक जाणिवांतून घटनांवर पोटतिडकीने परखड भाष्य.

 

लेखकाची पुस्तकं

रेड लाइट डायरीज…ख़ुलूस


समीर गायकवाड


रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !

अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.

खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !


300.00 Add to cart