रवींद्र पांढरे

रवींद्र पांढरे यांचा जन्म खानदेशातील पहूर ह्या गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असले, तरी गाव,  गावचे लोक, त्यांची बोली, गावाची शेती, शिवार यांच्याशी जन्मतःच जुळलेली नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे गाव आणि गावाचं शिवार हे लेखनाचे केंद्र , गावाची बोली हे साहित्याचं लेणं.

• प्रकाशित साहित्य :

लव्हाळ्याचे तुरे ( कवितासंग्रह )

मातीतली माणसं ( कथासंग्रह )

अवघाचि संसार ( कादंबरी )

गाण्यात झुलै रान ( किशोर कविता )

कथोकळी ( ललित गद्य )

पोटमारा ( कादंबरी )

प्रकाशनाच्या वाटेवर :  पोरकी माणसं ( कथासंग्रह )

• पुरस्कार : →

मातीतली माणसं ह्या कथासंग्रहास दोन पुरस्कार

१ ) रोहमारे ट्रस्टचा उत्कृष्ट ग्रामीण साहित्यनिर्मिती पुरस्कार

२ ) राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ग.ल. ठोकळ कथा पुरस्कार

• सन्मान : 'अवघाचि संसार' कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट 'घुसमट'

कथोकळी ' पहूर ( पेठ ) , ता . जामनेर , जि . जळगाव

लेखकाची पुस्तकं

सायड

 


रवींद्र पांढरे


प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते…
दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’.
शांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं,आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण…
 प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची -‘जामनेरी बोलीतली कादंबरी सायड !

200.00 Add to cart

मुडकं कुंपण

 


रवींद्र पांढरे


समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री !
अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची…
तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची….

समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण



160.00 Add to cart