125.00

मुडक कुंपण

 


रवींद्र पांढरे यांचा जन्म खानदेशातील पहूर ह्या गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असले, तरी गाव,  गावचे लोक, त्यांची बोली, गावाची शेती, शिवार यांच्याशी जन्मतःच जुळलेली नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे गाव आणि गावाचं शिवार हे लेखनाचे केंद्र , गावाची बोली हे साहित्याचं लेणं. • प्रकाशित साहित्य : लव्हाळ्याचे तुरे ( कवितासंग्रह ) मातीतली माणसं ( कथासंग्रह ) अवघाचि संसार ( कादंबरी ) गाण्यात झुलै रान ( किशोर कविता ) कथोकळी ( ललित गद्य ) पोटमारा ( कादंबरी ) प्रकाशनाच्या वाटेवर :  पोरकी माणसं ( कथासंग्रह ) • पुरस्कार : → मातीतली माणसं ह्या कथासंग्रहास दोन पुरस्कार १ ) रोहमारे ट्रस्टचा उत्कृष्ट ग्रामीण साहित्यनिर्मिती पुरस्कार २ ) राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ग.ल. ठोकळ कथा पुरस्कार • सन्मान : 'अवघाचि संसार' कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट 'घुसमट'
कथोकळी ' पहूर ( पेठ ) , ता . जामनेर , जि . जळगाव

समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री !
अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची…
तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची….

समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण


978-3-92374-83-8 Papar Back ,

Reading Time: 1 Minutes (89 words)

978-3-92374-83-8 mudka kumpan मुडक कुंपण ravindra pandhre रवींद्र पांढरे समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री !

अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची…

तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची….

समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण

paper back book Rohan Prakashan Marathi कादंबरी 125
340
Weight 300 g
Dimensions 21.7 × 14.1 × 1.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.