250.00

बहुगुणी मसाले


देशी आणि परदेशी मसाल्यांचा इतिहास विज्ञान व दैनंदिन वापर


डॉ. वर्षा जोशी


हळद, लवंग, दालचिनी, मिरी, हिंग…. अशा विविध मसाल्यांविना आपलं खाद्यजीवन (परिणामी सगळं आयुष्यच!) ‘बेचव’ होईल, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही! विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, आरोग्याला होणारे फायदे, त्यांचा वापर कसा करायचा याबद्दलची उपयुक्त माहिती अभ्यासपूर्ण आणि रंजकरीत्या सांगितली आहे. तसंच आपल्या खाद्यसंस्कृतीत अलीकडे ‘मिसळून गेलेल्या’ परदेशी हर्ब्सचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक ‘मसालेदार’ तर आहेच,

पण ते आपल्या मनात मसाल्यांच्या वापराबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनही जागवतं. भारतीय पाकसंस्कृतीचा ‘प्राण’ असलेल्या मसाल्यांची ‘ऑथेंटिक’ माहिती देणारं पुस्तक….बहुगुणी मसाले!



 

978-3-92374-78-4 papar back 133 ,
Share
978-3-92374-75-3 Hirabai badodekar हिराबाई बडोदेकर गायनकलेतील तारषड्ज dr. shubhada kulkarni डॉ. शुभदा कुलकर्णी ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची.

सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर.

डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल !

– डॉ. चैतन्य कुंटे

paper back book Rohan Prakashan Marathi 133 व्यक्तीरंग informative माहितीपर biography चरित्र 225 325
Weight 300 g
Dimensions 21.7 × 14.1 × 1.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.