978-93-92374-52-7 | vishwa alankaranch | विश्व अलंकाराचं | वैज्ञानिक माहिती व रंजक ज्ञान | डॉ. वर्षा जोशी | विश्व अलंकारांचं
सजण्याची-नटण्याची मानवाची आकांक्षा नैसर्गिक आणि मूलभूत आहे. त्यासाठी विविध धातू, रत्न, शंख-शिंपले आदींचा वापर करून अलंकार तयार करण्याची परंपरा आदिम काळापासून सुरू आहे. या पुस्तकात या अलंकरांची, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंची, तसंच हिरे-रत्न इत्यादींची ‘ऑथेंटिक’ वैज्ञानिक माहिती देऊन डॉ. वर्षा जोशी थांबत नाहीत, तर त्या इतरही उपयुक्त तसेच रंजक माहिती देऊन अलंकारांचं विश्व आपल्यापुढे उघड करतात. या पुस्तकातले महत्त्वाचे विषय : १. शुद्ध सोनं किंवा चांदी मिळवण्याची प्रक्रिया २. कॅरट म्हणजे काय? त्याचा रंजक इतिहास ३. सोन्या-चांदीचे अलंकार तयार करताना कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात? ४. मीनाकारी, कुंदन इत्यादी शैलीतल्या कलाकुसरी कशा साकारल्या जातात? ५. मोती कसा तयार होतो, त्याचे वेगवेगळे प्रकार ६. नवरत्नांची माहिती, त्यांवर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रिया ७. आपल्या मौल्यवान दागिन्यांची निगा कशी राखावी? आणि बरंच काही… आपलं सौंदर्य खुलवणाऱ्या कलात्मक साजाची सर्वांगीण माहिती देऊन ज्ञानरंजन करणारं पुस्तक… विश्व अलंकारांचं ! |
Papar back | book | Rohan Prakashan | Marathi | 135 | माहितीपर | 225 |
Reviews
There are no reviews yet.