Reading Time: 3 Minutes (283 words)
267 | 978-93-82591-57-3 | Keval ‘IT’ tach | केवळ एटीतच | भारतातील एका ‘बूमिंग’उद्योगाचा विलक्षण प्रवास | Atul Kahate | अतुल कहाते | आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी! आयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली! नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली… मात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं… अशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक… केवळ ‘आयटी’तच…! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 159 | 21.6 | 14 | 0.9 | 170 |
In our day to day life we often hear words like Information Technology, BPO and Call Centre. But very few people know the exact meaning of these terms. Atul Kahate in this book introduces the big world of IT. He tells us the origin and development of this field in India. How this field took charge of Indian Financial and technological scenario and what was the impact of IT on Indians.
|
Business | व्यवसाय | Informative | माहितीपर | 150 | Keval ‘IT’tach_RGB | Keval ‘IT’tachBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.