183 | 978-93-80361-56-7 | Tumhihi vha Dhadadiche Udyojak | तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक | हाय परफॉरमन्स’ साधून व्यवसाय किंवा उद्योगात यशस्वी होण्याचे मौलिक मंत्र | Subroto Bagchi | सुब्रोतो बागची | Chitra Walimbe | चित्रा वाळिंबे | उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करतं आणि त्यांना दिशा दर्शवतं. उद्योगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्यं कोणती, धडाडीच्या वृत्तीचं महत्त्व किती हे सर्व या पुस्तकात अतिशय समर्पकपणे सांगितलं आहे. पुस्तकाचे लेखक सुब्रोतो बागची यांनी MindTree ही त्यांची कंपनी वयाच्या ४२व्या वर्षी सुरू केली. शून्यापासून सुरू केलेली ही कंपनी सहा वर्षांत त्यांनी उच्च स्थानावर पोचवली, ती धडाडी व कार्यक्षमता यांच्या बळावर! त्या अनुभवांतून साकार झालेलं बागची यांचं हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठया उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरतं! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 238 | 20.5 | 13.7 | 1.3 | 225 |
Guidance to be a high performance entrepreneur
|
Self – Help | व्यक्तिमत्व विकास | Business | व्यवसाय | 200 | Dhadadiche Udyojak.jpg | Dhadadicha UdyojakBC.jpg |
सुंदर पिचई
गुगलचं भविष्य
जगमोहन एस. भानवर
अनुवाद :रमा हर्डीकर-सखदेव
जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी…
तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे.
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक
सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…
Reviews
There are no reviews yet.