उद्योग करावा ऐसा (डिलक्स आवृत्ती)
₹300.00
२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स
- डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षं वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा केली आहे. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्हिएन्ना येथील IAEA या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमचं त्यांनी नेतृत्व केलं आहे.
- व्यवसायावर आधारित प्रत्येकी २० भागांच्या तीन टी. व्ही. मालिका त्यांनी सादर केल्या. उद्योग व्यवसायावर व सामाजिक विषयांवर आधारित २१ पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
- गेली ३० वर्ष ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या ते सुप्रसिद्ध हावरे प्रॉपर्टीज समूहाचे अध्यक्ष आहेत. साडेचार कोटी वर्गफूट बांधकाम व ४५००० पेक्षा जास्त घरं त्यांनी आतापर्यंत बांधली व ग्राहकांना सुपुर्द केली आहेत.
- गिर्यारोहण हा त्यांचा आवडीचा छंद आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅप, माऊंट अन्नपूर्णा बेस कॅप व नेपाळमधील आयलँड पिक शिखर ६००० मीटरपर्यंत त्यांनी सर केलं आहे.
- तसेच अंटार्क्टिकाची साहसी सफर त्यांनी पूर्ण केली आहे.
- विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचं योगदान आहे.
- त्यांना ३२ नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पुरस्कार मिळालेले आहेत.
- सध्या ते 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूरचे चेअरमन आहेत आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भिलाई'चेही चेअरमन आहेत.
- देशातील सर्वांत उंचावरील मंदिर, 'श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड'चे ते बोर्ड मेंबर आहेत.
- भारतातील दुसरं सर्वांत मोठं मंदिर असलेल्या 'श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी (महाराष्ट्र)'चे ते चार वर्ष अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री दर्जा प्रदान करण्यात आलेला होता.
- जे. एन. पी. टी. या सर्वांत मोठ्या बंदराचे ते तीन वर्षं विश्वस्त होते.
‘उद्योग तुमचा, पैसा दुसर्याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.
हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या ‘शो’मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा ‘शो’ बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले.
हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !
















Reviews
There are no reviews yet.