सुरेश हावरे

प्रथितयश उद्योजक आणि प्रेरणादायी बिझनेस लिडर म्हणून सुरेश हावरे परिचित आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.एससी.टेक. ही पदवी संपादित केली. भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमधून त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षणही पूर्ण केलं. शिवाय त्यांनी इतिहास या विषयात एम.ए. केलं असून नुकतेच त्यांना ‘अ‍ॅफोर्डेबल नॅनो हाऊसिंग' या विषयासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टरेट) या पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. नागपूर विद्यापीठाचे ते मेरिट स्कॉलर व इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत.
  • डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षं वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा केली आहे. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्हिएन्ना येथील IAEA या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमचं त्यांनी नेतृत्व केलं आहे.
  • व्यवसायावर आधारित प्रत्येकी २० भागांच्या तीन टी. व्ही. मालिका त्यांनी सादर केल्या. उद्योग व्यवसायावर व सामाजिक विषयांवर आधारित २१ पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
  • गेली ३० वर्ष ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या ते सुप्रसिद्ध हावरे प्रॉपर्टीज समूहाचे अध्यक्ष आहेत. साडेचार कोटी वर्गफूट बांधकाम व ४५००० पेक्षा जास्त घरं त्यांनी आतापर्यंत बांधली व ग्राहकांना सुपुर्द केली आहेत.
  • गिर्यारोहण हा त्यांचा आवडीचा छंद आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅप, माऊंट अन्नपूर्णा बेस कॅप व नेपाळमधील आयलँड पिक शिखर ६००० मीटरपर्यंत त्यांनी सर केलं आहे.
  • तसेच अंटार्क्टिकाची साहसी सफर त्यांनी पूर्ण केली आहे.
  • विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचं योगदान आहे.
  • त्यांना ३२ नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पुरस्कार मिळालेले आहेत.
  • सध्या ते 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूरचे चेअरमन आहेत आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भिलाई'चेही चेअरमन आहेत.
  • देशातील सर्वांत उंचावरील मंदिर, 'श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड'चे ते बोर्ड मेंबर आहेत.
  • भारतातील दुसरं सर्वांत मोठं मंदिर असलेल्या 'श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी (महाराष्ट्र)'चे ते चार वर्ष अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री दर्जा प्रदान करण्यात आलेला होता.
  • जे. एन. पी. टी. या सर्वांत मोठ्या बंदराचे ते तीन वर्षं विश्वस्त होते.
पत्ता : २३०५, हावरे इन्फोटेक पार्क, प्लॉट नंबर ३९/३, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई. महाराष्ट्र (भारत), पिन ४००७०५. भ्रमणध्वनी : ९८२०१८२९३० (फक्त SMS/WA)md@haware.in www.sureshhaware.in