गायनाचे रंगी
नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका म्हणून ख्यातकीर्त… परंतु चौकटीबाहेर पडून शास्त्रीय गायनात अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या कलाकार म्हणून असलेली त्यांची ओळख काकणभर जास्तच भरते.
ख्याल गायनात परंपरेने चालत आलेल्या बंदिशी बहुतांश वेळा ‘सौतन-साँस-नणंद’ या ‘पुरुषसत्ताक विचारांचं उदात्तीकरण’ म्हणून गणना होऊ शकणाऱ्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. नीला भागवत यांनी मात्र निर्मळ मानवी सहभावनेच्या विचारांच्या बंदिशी रचण्याचे प्रयोग केले आहेत.
या पुस्तकात या प्रयोगांविषयी, त्यांतील अनुभवांविषयी त्या विस्ताराने सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना ज्या संतसाहित्यातील प्रेम, करुणा, समता, एकता, मानवधर्म अशा भावनांनी प्रभावित केले, त्या प्रभावातून त्यांनी निर्माण केलेल्या संगीताविषयीही त्या आपले विचार मांडतात.
गायनाचे रंगी संगीत क्षेत्रातील त्यांची प्रेरणास्थानं, गुरु यांचीही त्यांनी कृतज्ञ भावनेने व्यक्तिचित्रणं पुस्तकात साकारली आहेत.
शास्त्रीय संगीताचा चौकटीबाहेर जाऊन बहुपेडी विचार करणारं पुस्तक… गायनाचे रंगी