अफ़साना लिख रही हूँ


चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील परस्पर मेळ उलगडणारे अफसाने


पं. गजाननबुवा जोशी, पं. एस.के. अभ्यंकर, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी यांच्याकडे प्रा. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं असून त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी (विशेष प्रावीण्यासहित) प्राप्त केली आहे. त्यानंतर संगीत विषयात एम.ए. करून त्या विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांनी ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली असून हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्यं सांगत, त्यांतील बारकावे उलगडून दाखवत गायनाचे सादर केलेले वैशिष्ट्यपूर्ण असे हजारो जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत. हिंदी चित्रपट गीतांवरचं त्यांचं लेखन केवळ गाण्याच्या चाली, शब्द एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तर त्यातलं ऑक्रेस्ट्रायझेशन, त्यातली वाद्यं, त्यांची वैशिष्ट्यं तसंच ते गाणं रचणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं हे त्या नेमकेपणाने उलगडून सांगतात आणि त्याकडे पाहण्याचा एक सखोल दृष्टिकोन देतात. त्या संगीताबरोबरच विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करत असल्यामुळे त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात लीलया येतात. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू!
अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई.
चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं…
अफ़साना लिख रही हूँ! 


 

260.00 Add to cart

आपलं विश्व आणि त्यांची नवलकथा


विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत


सुकल्प श्रीकांत कारंजेकर शिक्षण : अभियांत्रिकी (B.E.). माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १७ वर्षांचा अनुभव. विश्वशास्त्र, उत्क्रांती, भूगर्भशास्त्र, जागतिक इतिहास, मेंदूशास्त्र, वर्तनवादी अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांचा अनौपचारिक अभ्यास. यापैकी काही विषयांवरील लेख विविध मासिकांमध्ये प्रकाशित भ्रमणध्वनी : ८०८७२८८८९६ Email : writetosukalp@gmail.com

“आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ या आगळ्यावेगळ्या सचित्र ग्रंथात सुकल्प कारंजेकर यांनी विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या भवितव्यापर्यंत विविधांगी विश्ववेध घेतलेला आहे. विश्वशास्त्रासारख्या अद्भुत विषयाचा हा सुबोध, पण अभ्यासपूर्ण परिचय आहे. त्याला विज्ञानाची बैठक आहे, पण त्यात कथनातील कोरडेपणा वा तंत्रशरणता नाही. केवळ विज्ञानाच्या नव्हे, तर साहित्य-तत्त्वज्ञानाच्या अंगानेसुद्धा हजारो वर्षांची विश्वकहाणी ते रंजक पद्धतीने मांडत जातात. या मांडणीत आंतरविद्याशाखीयतेचा प्रत्यय येतो. नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार ग्रंथनिर्मितीवर भर देणाऱ्या ‘रोहन प्रकाशना’ने हाती ठेवलेली ही ‘सुकल्पित’ नवलकथा खचितच वाचक- विश्वाच्या पसंतीला उतरेल.

-राजा दीक्षित

सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor)
अध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

 

विश्वाचा उगम कसा झाला असेल ?

विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपलं स्थान काय ? हे प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाच्या सोबत आहेत.

त्याची उत्तरंही वेगवेगळ्या संस्कृती सभ्यतांमध्ये उत्पत्तीकथांमार्फत द्यायचा प्रयत्न झाला, तर आधुनिक काळात माणसाने ही कोडी विज्ञानाच्या साहाय्याने सोडवली…. आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे…..

थोडक्यात, विश्व समजून घेण्याचा माणसाचा प्रवास हजारो वर्षांपासूनचा आहे.

या प्रवासाचीच ही उद्बोधक गोष्ट….

कुमारांपासून मोठ्यांपर्यंत; सगळ्यांचं कुतूहल शमवणारं….

मायमराठीत, सोप्या पद्धतीने अनेक वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणारं…

रंजक आणि तितकीच सखोल माहिती देणारं…
आपल्याकडे असलंच पाहिजे असं ‘मस्ट रीड’ पुस्तक… आपलं विश्व


 

1,095.00 895.00 Add to cart

न्यूरोसर्जरीच्या पाउलखुणा

मेंदू आणि मणक्याचे आजार व उपचार



मेंदू आणि त्याला जोडून असलेला मणका हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे; तितकेच नाजूक अवयव. पण त्यांच्या आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदीर्घ अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते या पुस्तकातून मेंदू व मणक्याशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरील योग्य उपचार यांची ओळख सहजसोप्या भाषेत करून देतात.

पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय –

  • ब्रेन ट्यूमर
  • चेहऱ्याची असह्य वेदना (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया)
  • डोळा मारण्याचा आजार व त्यावरील उपचार वरदान ठरलेली एमव्हीडी शस्त्रक्रिया
  • एमआरआयचं तंत्रज्ञान
  • स्लिप डिस्क
  • मेंदूचं कामशास्त्र
  • साठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी….

मेंदू आणि मणका यांची कार्य, त्यांचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांबद्दल तसेच त्या अनुषंगाने रंजक, उद्बोधक आणि उपयुक्त माहिती देणारं पुस्तक

न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा….


 

340.00 Add to cart

रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे

 



रवीन्द्रनाथ यांच्यासारखं कविमन, चौकस निरीक्षणक्षमता, लेखनाची चित्रमय शैली, आता बांगला देशात असलेल्या प्रदेशात पद्मा नदीकाठी वसलेल्या निसर्गरम्य गावाची पार्श्वभूमी आणि पत्रलेखनासारखं प्रवाही माध्यम…..

वयाच्या पंचविशी-तिशीत म्हणजे १८८५ ते १८९५ या दरम्यान रवीन्द्रनाथांनी आपली पुतणी, सत्येन्द्रनाथ टागोरांची कन्या इंदिरादेवी हिच्याशी पत्र – संवाद साधला होता….

पुढील काळात रवीन्द्रनाथांनी लिहिलेल्या कथा-कवितांत या पत्र-संवादाचे अनेक कवडसे दिसून येतात. उदाहरण द्यायचं तर ‘तीन कन्या’ या सत्यजित राय दिग्दर्शित चित्रपटत्रयीची कथा….

बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवलेल्या विलास गिते यांनी थेट बंगाली भाषेतून मराठीत अनुवादित केलेली अभिजात साहित्यकृती….

रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे

295.00 Add to cart

गायनाचे रंगी

 



नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका म्हणून ख्यातकीर्त… परंतु चौकटीबाहेर पडून शास्त्रीय गायनात अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या कलाकार म्हणून असलेली त्यांची ओळख काकणभर जास्तच भरते.

ख्याल गायनात परंपरेने चालत आलेल्या बंदिशी बहुतांश वेळा ‘सौतन-साँस-नणंद’ या ‘पुरुषसत्ताक विचारांचं उदात्तीकरण’ म्हणून गणना होऊ शकणाऱ्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. नीला भागवत यांनी मात्र निर्मळ मानवी सहभावनेच्या विचारांच्या बंदिशी रचण्याचे प्रयोग केले आहेत.

या पुस्तकात या प्रयोगांविषयी, त्यांतील अनुभवांविषयी त्या विस्ताराने सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना ज्या संतसाहित्यातील प्रेम, करुणा, समता, एकता, मानवधर्म अशा भावनांनी प्रभावित केले, त्या प्रभावातून त्यांनी निर्माण केलेल्या संगीताविषयीही त्या आपले विचार मांडतात.
गायनाचे रंगी संगीत क्षेत्रातील त्यांची प्रेरणास्थानं, गुरु यांचीही त्यांनी कृतज्ञ भावनेने व्यक्तिचित्रणं पुस्तकात साकारली आहेत.
शास्त्रीय संगीताचा चौकटीबाहेर जाऊन बहुपेडी विचार करणारं पुस्तक… गायनाचे रंगी


240.00 Add to cart

मुडक कुंपण

 


रवींद्र पांढरे यांचा जन्म खानदेशातील पहूर ह्या गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असले, तरी गाव,  गावचे लोक, त्यांची बोली, गावाची शेती, शिवार यांच्याशी जन्मतःच जुळलेली नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे गाव आणि गावाचं शिवार हे लेखनाचे केंद्र , गावाची बोली हे साहित्याचं लेणं. • प्रकाशित साहित्य : लव्हाळ्याचे तुरे ( कवितासंग्रह ) मातीतली माणसं ( कथासंग्रह ) अवघाचि संसार ( कादंबरी ) गाण्यात झुलै रान ( किशोर कविता ) कथोकळी ( ललित गद्य ) पोटमारा ( कादंबरी ) प्रकाशनाच्या वाटेवर :  पोरकी माणसं ( कथासंग्रह ) • पुरस्कार : → मातीतली माणसं ह्या कथासंग्रहास दोन पुरस्कार १ ) रोहमारे ट्रस्टचा उत्कृष्ट ग्रामीण साहित्यनिर्मिती पुरस्कार २ ) राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ग.ल. ठोकळ कथा पुरस्कार • सन्मान : 'अवघाचि संसार' कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट 'घुसमट'
कथोकळी ' पहूर ( पेठ ) , ता . जामनेर , जि . जळगाव

समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री !
अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची…
तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची….

समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण


125.00 Add to cart

हिट्स ऑफ नाईन्टी टू

 


दीड दशकापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत . मुंबई सकाळमधून लेखनास सुरुवात. सध्या 'दैनिक' लोकसत्ता'मध्ये वरिष्ठ मुख्य उपसंपादकपदाची जबाबदारी. वृत्तधबडग्यात पूर्णवेळ बांधील राहूनही सकाळ समूहातून चित्रपट , संगीतविषयक सदर - लेखनास सुरुवात. ' लोकसत्ता ' मध्ये हीच जबाबदारी सांभाळत त्या बरोबरीने हॉलीवूड चित्रपट , आंतरराष्ट्रीय संगीत आणि बदलत्या दृक माध्यमांवर काही वर्षे स्तंभलेखन बुकमार्क या शनिवार लोकसत्ताच्या पानासाठी विपुल लेखन . या लेखनासाठी मुंबई विद्यापीठाचा अरुण टिकेकर पुरस्कार २०१८ आणि विश्व संवाद केंद्र , मुंबई येथील देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०१ ९ . रहस्यकथा या दुर्लक्षित लेखनप्रकाराच्या अभ्यासासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची २०१ ९ सालातील अभ्यासवृत्ती . त्याद्वारे राज्यभर पुस्तकभटकंती . जुनी आणि दुर्मीळ मराठी पुस्तके वाचविण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठीच फक्त समाजमाध्यमांमध्ये कार्यरत इतिहास आणि मराठी या विषयांत एम.ए.

ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला अनेक वर्षांनी पुन्हा आठवणींचा मोहोर फुटला तो पंकज भोसलेच्या कथांमुळे. एका विशिष्ट विनोदबुद्धीने साकारलेल्या ह्या कथा नुसत्या परिसर कहाण्या नसून नव्वदीच्या दशकातील, महाराष्ट्रातील शहरी तरुणाची मनःस्थिती सांगणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स आहेत. पंकजने कथा लिहिताना कॅसेटवरील ट्रॅक्सना नंबर द्यावेत तसे प्रकरणांना नंबर दिले आहेत. अभिजात जगणे, अभिजात ऐकणे, अभिजात पाहणे ह्या संस्कारांना चुना लावून, आधीच्या पिढीने पोसलेल्या फालतू आदर्शवादाला मधले बोट दाखवून, मोठ्या लाटेप्रमाणे आलेल्या हिंदी भाषेतील पॉप्युलर करमणुकीच्या संस्कृतीला नुसते आपलेसे करूनच नाही, तर त्यातील गाभ्यावर विश्वास ठेवून, आपले आयुष्य आखणाऱ्या स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या मराठी तरुण पिढीचे हे कथारूपी विश्व आहे.

– सचिन कुंडलकर


 

340.00 Add to cart

हवा हवाई

 


विजय नाईक यांचा जन्म १ जुलै, १९४५ रोजी अहमदनगर येथे झाला असून १९६७ साला पासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य आहे. सध्या ते ‘सकाळ पेपर्स’चे सल्लागार-संपादक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ‘दै. गोमंतक’ व त्यानंतर ‘सकाळ’चे दिल्लीतील वार्ताहर व ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन करण्यासाठी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. भारतीय राजकारण, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी व शिष्टाई या विषयासंबंधी त्यांचं विशेष अध्ययन असून त्यावर त्याचं लिखाण सुरू असतं. १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे. ईशान्य भारतातील सशस्त्र बंडखोरी, पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशन, कारगिलचे युद्ध आदी घडामोडींचं वार्तांकन त्यांनी केलं आहे. गेली चाळीस वर्षं ते संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करत आहेत. आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता झाल्यावर ‘सकाळ’च्या वतीनं दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तेथील घटनांचं वार्तांकन करणारे पहिले ‘मराठी पत्रकार’ म्हणून त्यांना ओळखलं जात. विजय नाईक हे ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे माजी सदस्य, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे माजी सरचिटणीस, लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकारविषयक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्स’ या संस्थेचे विद्यमान निमंत्रक, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना व ‘कॉमनवेल्थ जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष, दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टर व हॅबिटॅट सेन्टरचे सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

हवाई बेटसमूहाची सर्वसामान्यांमधली ओळख एका बाजूला नितांतसुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून असते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं पन्नासावं घटकराज्य म्हणून जगाच्या नकाशावरचं त्याचं स्थान काहीसं अपरिचित असतं….

मात्र, एवढं निश्चित की ‘हवाई बेट’ हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. हे कुतूहल या पुस्तकातून अनेक अंगाने शमवलं जातं. हवाई बेटांची मूळ पॉलिनेशियन संस्कृती, राजकीय इतिहास, लोक-संस्कृती, तेथील निसर्गसौंदर्य आणि त्यातील वैविध्य या सर्वांची सविस्तर ओळख या पुस्तकातून होते.

ही ओळख करून देता देता आजवर त्रेपन्न देशांची भ्रमंती केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे जगप्रसिद्ध लेखक विचारवंत मार्क ट्वेन, कॅ. जेम्स कुक अशा हस्तींच्या तेथील वास्तव्याचा मागोवा घेतात. तसेच अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांची जन्मभूमी म्हणूनही ते ‘हवाई’कडे दृष्टिक्षेप टाकतात आणि तेथील स्थलांतरित भारतीयांचीही माहिती देतात. दुसऱ्या महायुद्धातील ‘पर्ल हार्बर’वरील जपानचा हल्ला तेथे म्युझियमरूपात कसा ‘जीवंत’ आहे, हेही नाईक पुस्तकात सांगतात.

या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं की लेखकाचं तेथील दीर्घ वास्तव्य आणि त्या वास्तव्यादरम्यान पाहिलेलं, अनुभवलेलं, अभ्यासलेलं ‘हवाई’ ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात.

हवाईचा सर्वस्पर्शी छोटेखानी एन्सायक्लोपेडिया… हवा हवाई!



 

250.00 Add to cart

बहुगुणी मसाले


देशी आणि परदेशी मसाल्यांचा इतिहास विज्ञान व दैनंदिन वापर


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

हळद, लवंग, दालचिनी, मिरी, हिंग…. अशा विविध मसाल्यांविना आपलं खाद्यजीवन (परिणामी सगळं आयुष्यच!) ‘बेचव’ होईल, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही! विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, आरोग्याला होणारे फायदे, त्यांचा वापर कसा करायचा याबद्दलची उपयुक्त माहिती अभ्यासपूर्ण आणि रंजकरीत्या सांगितली आहे. तसंच आपल्या खाद्यसंस्कृतीत अलीकडे ‘मिसळून गेलेल्या’ परदेशी हर्ब्सचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक ‘मसालेदार’ तर आहेच,

पण ते आपल्या मनात मसाल्यांच्या वापराबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनही जागवतं. भारतीय पाकसंस्कृतीचा ‘प्राण’ असलेल्या मसाल्यांची ‘ऑथेंटिक’ माहिती देणारं पुस्तक….बहुगुणी मसाले!


 

225.00 Add to cart

हिराबाई बडोदेकर


गायनकलेतील तारषड्ज


डॉ. शुभदा कुलकर्णी
  • प्राणिशास्त्रात पदवी डिस्टिंक्शन, कायद्यातील पदव्युत्तर शिक्षण
  • त्यानंतर एच.डी.एफ.सी. या वित्तसंस्थेत सतरा वर्ष नोकरी
  • १९९९ मध्ये स्वयंनिवृत्ती घेऊन संगीताचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन, लिखाण D एम.ए. (संगीत) परीक्षेत सुवर्णपदक आणि मानहिराच्या मानकरी,
  • सी. रामचंद्र, कल्याणजी, उषा उमरणी इत्यादी पारितोषिके
  • केंद्र सरकारची 'संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम' या विषयावरील संशोधनासाठी सीनियर रिसर्च फेलोशिप आणि नंतर त्यावर प्रबंध लिखाण
  • पं. भास्कर चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगभावीय संदर्भातून विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील गायिकांचे कार्य' या विषयावरील पीएच. डी. त्या प्रबंधावर आधारित 'गायिका आणि गायकी' हे पुस्तक (२०११) प्रकाशित (अमलताश पब्लिशर्स)
  • २०१० साली 'महाराष्ट्रातील संगीत परंपरा' पुस्तक प्रकाशित ( डायमंड प्रकाशन)
  • 'विज्ञानातील का व कसे' या पुस्तकाचे डॉ. प्र. न. जोशींबरोबर सहलेखन
  • 'स्पर्शज्ञान' या ब्रेल पाक्षिकातून संगीतावर शंभरहून अधिक लेख 'महाराष्ट्राचे शिल्पकार' या चरित्रकोशातील संगीत खंडात पन्नासहून अधिक लेख
  • सकाळ स्वरसमूहाचे त्रैमासिक 'स्वररंगमधून संगीतावर लेखमाला 'संगीत कलाविहार' या १४० वर्षांची परंपरा असलेल्या मासिकाच्या एका अंकाचं अतिथी संपादन
  • 'समग्र मराठी भावसंगीत' प्रकल्प पूर्ण
  • पद्मगंधा, लोकसत्ता आदी दिवाळी अंकांतून कथालेखन
  •  'तवायफनामा' या सबा दिवानलिखित पुस्तकाचा अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशनाच्या वाटेवर उत्क्रांती शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या आत्मचरित्राचा अनुवाद - अप्रकाशित 'म्युझिकल जर्नी ऑफ कुमार गंधर्व' या राघव मेनन लिखित पुस्तकाचा अनुवाद अप्रकाशित -
  • ६-७ विद्यार्थ्यांना २२ वर्ष संगीताचं एकास एक पद्धतीचं अध्यापन संगीत रसास्वादाच्या कार्यशाळा प्रयास, वनस्थळी, नीहार (आता मानव्य) सारख्या सामाजिक संस्थांमधून काम व लिखाण २०२३ सालचा डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा संगीतातील लिखाण व संशोधनातल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल दिला जाणारा 'वसंतोत्सव' पुरस्कार कबीर भजनं व शास्त्रीय गायनाचं बैठकीत सादरीकरण कंठसंगीतातील गुरू : पं. गोविंदराव देसाई, विदुषी शशिकला शिरगोपीकर, पं. विजय सरदेशमुख

ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची.

सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर.

डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल !

– डॉ. चैतन्य कुंटे


 

325.00 Add to cart

जयप्रकाश प्रधान ७ पुस्तकांचा भटकंती संच


‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश प्रधान २८ वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रांतील त्यांची अनेक बातमीपत्रं साऱ्या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली. त्यावर आधारित ‘बातमीमागची बातमी’ हे त्यांचं पुस्तक खूपच लोकप्रिय झालं आहे. ‘पर्यटन’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा छंद. परदेशातील आगळ्यावेगळ्या स्थळांना, ग्रामीण भागांना भेटी देऊन, तेथील संस्कृती, चालीरीती, जुने अवशेष तसंच लोक, समाज, खाद्यपदार्थ यांची रोचक माहिती मिळवण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती यांना विशेष रस असतो. पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. म्हणजे ३५ टक्क्यांपेक्षा थोड्या अधिक जगाची भटकंती त्या दोघांनी पूर्ण केली आहे. हा प्रवास म्हणजे केवळ त्या देशाला, प्रदेशाला भोज्जा किंवा ‘१२ दिवसांत १० देश’ या पद्धतीचा झाला नाही. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील नामांकित आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल किंवा क्रुझ कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना वेगळ्याच जगाचं दर्शन घडलं. ‘अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे,' या इच्छेमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेली नाही.

जयप्रकाश प्रधान लिखित ७ पुस्तकांचा भटकंती संच


१) ऑफबीट भटकंती भाग १ : २५० रु
२) ऑफबीट भटकंती भाग २ : ३०० रु
३) ऑफबीट भटकंती  भाग ३ : २५० रु
४) जे’पीज भटकंती टिप्स – २०० रु
५) एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती : २५० रु
६) भटकंती आगळ्या वेगळ्या देशांची : २५० रु
७) भटकंती सप्तरंगी बेटांची : २५० रु


एकूण संच  रु १,८५० सवलतीत रु १,२९५ मध्ये (टपाल खर्चासहित) घरपोच.   


 

1,850.00 1,295.00 Add to cart

गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा


लक्ष्मीकांत देशमुख हे निवृत्त प्रशासकीय IAS अधिकारी २०१८मध्ये बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची आजवर एकतीस मराठी, पाच इंग्रजी व दोन हिंदी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आजही त्यांचा लेखनप्रवास अव्याहतपणे चालू आहे. त्यांना राज्य शासनाचे तीन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचे पाच महाराष्ट्र साहित्य परिषद-औरंगाबादचे दोन आणि अन्य वाङ्मयीन संस्थांचे विविध साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'भारतीय संविधान' हा त्यांचा श्रद्धेचा तसेच अभ्यासाचा विषय व ते विचार आपल्या दैनंदिन जीवनात जगण्याचा प्रयत्न... मुस्लिम समाज व त्यांचं जीवन, उर्दू भाषा, LGBTQ समाजाचं जगणं व त्यांचे प्रश्न समजून घेणं, आंतर भारतीच्या विचारांचा प्रसार आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणं हे देशमुखांच्या आजच्या जगण्याचा अपरिहार्य भाग झाले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सक्तीने मराठीचा कायदा मंजूर करून घेण्यात पुढाकार..... मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायद्यासाठी पाठपुरावा... 'मराठीच्या भल्यासाठी' या मराठीच्या विकास करणाऱ्या संस्थेचे कार्याध्यक्ष.... अशा सर्व विधायक कामात गर्क राहता राहता देशमुख बॅडमिंटन व टेबल टेनिस या खेळांची आवड जोपासतात... खेळ-खेळाडू यांच्याविषयी आत्मीयता बाळगतात आणि त्यांचं जीवनचरित्र वाचण्यात रस घेतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड स्टार्स, गोल्डन इराचं फिल्म संगीत, संगीतकार, गीतकार यांत मनापासून रमतात.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे.

भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो.

एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे.

– आसाराम लोमटे


 

295.00 Add to cart
1 2 50