978-3-92374-70-8 | Endgame | एन्डगेम | S. Hussain Zaidi | एस. हुसैन झैदी | Rama Hardikar- sakhadev | रमा हर्डीकर- सखदेव | बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे
ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो. राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात…. |
paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 160 | Mohor | fiction | कादंबरी | 240 |
रॉबर्टसनचं माणिक व इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा…
१.सुनील तरफदार यांचा जादूचा कार्यक्रम, त्यातल्या ‘ज्योतिष्का’ उर्फ़ नयन या लहान मुलामुळे चांगलाच गाजू लागतो. नयनच्या अफाट बुद्धिक्षमतेमुळे तो नोटांवरचे क्रमांक, खिशातले पैसे असे कोणतेही आकडे झटक्यात अचूक सांगू शकत असतो. हे समजताच त्याच्या मालकीसाठी काही धनाढ्य माणसं वाट्टेल ते करायला तयार होतात, आणि अचानक नयन गायब होतो! आणि नयनचं रहस्य अधिकच गहिरं होत जातं…
२.ब्रिटिशकाळात भारतात सैनिक असलेल्या पीटरच्या आजोबांनी एका लुटीत एक माणिक घेतलेलं असतं. ते तो कलकत्त्याच्या संग्रहालयाला परत करण्यासाठी भारतात, आपल्या मित्रासोबत आलेला असतो. त्याच्याशी बोलताना फेलूदाला असं कळतं की, त्या माणकावर काही लोकांचा डोळा असून त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत… फेलूदाला रॉबर्टसनचं माणिक सुरक्षित ठेवता येईल?
३.जादूगार सोमेश्वर बर्मन यांनी गावोगावी जाऊन जादूचे प्रयोग केलेले असतात, त्याबद्दलची माहिती गोळा करून त्याचं संकलन केलेलं असतं. हे संकलित हस्तलिखित एका जादूगाराला विकत घ्यायचं असतं. त्याबद्दल सल्ला घेण्यासाठी ते फेलूदाकडे येतात. अन् अचानक बर्मन यांच्याकडे असलेल्या एका ‘मौल्यवान’ गोष्टीचं इंद्रजाल रहस्य समोर येतं…!
Reviews
There are no reviews yet.