संपूर्ण पाककला – शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती

सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच


उषा पुरोहित


मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन

सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!



295.00 Add to cart

संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती

सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच


उषा पुरोहित


मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन

सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!


260.00 Read more

आरोग्यदायी जीवनसत्त्वे

उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण


हरी कृष्ण बाखरू
अनुवाद : डॉ. अरुण मांडे


आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अ‍ॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.


200.00 Add to cart

संगोपन तान्हुल्याचे


डॉ. अरुण मांडे


माझ्या तान्हुल्याची निरोगी वाढ कशी होईल, हीच एक काळजी प्रत्येक सुजाण मातेच्या मनाचा कोपरान् कोपरा व्यापून राहते. आपल्या बाळाची वाढ कशी राखावी, कोणत्या दक्षता घ्याव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात इत्यादींबाबत सोपी शास्त्रीय माहिती इथे दिलेली आहे. पहिल्या वर्षातली प्रत्येक टप्प्यावर होणारी आपल्या बाळाची वाढ आरोग्यसंपन्न व्हावी, बाळ सुदृढ व निरोगी व्हावे यासाठी सोप्या, साध्या, सरळ भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक.


100.00 Add to cart

स्वयंपाकघरातील विज्ञान

विविधांगी शास्त्रीय माहिती, मार्गदर्शन व अनेक उपयुक्त सूचना


[taxonomy_list name=”product_author” include=”391″]


स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा…
विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात!
धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते?
प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते?
विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात?
आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील?
विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल?
डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत.
आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक…
स्वयंपाकघरातील विज्ञान!


340.00 Add to cart

वॉर्ड नंबर पाच, केईएम

डॉ. रवी बापट

सुनीती जैन


ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…



395.00 Add to cart

यांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००)

गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्‍तींचा वेध…


संपादन : मिलिंद चांपानेरकर , सुहास कुलकर्णी


या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.


555.00 Add to cart

अभ्यास कौशल्य


डॉ. नन्दिनी दिवाण


अभ्यास आणि परीक्षा या विद्यार्थिजीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात तर परिक्षेतल्या यशाला मोठे महत्त्व आले आहे, त्या दृष्टीने अभ्यासाची योग्य पध्दती समजावून घेणे आवश्यक ठरते. अभ्यास-कौशल्य म्हणजे काय? श्रवण, वाचन, स्मरणशक्ती, लेखन इत्यादी घटकांचा योग्य वापर कसा करावा? परीक्षातंत्र कसे विकसित करावे? त्यात पालकांची भूमिका काय असावी? या सर्व गोष्टींचे मानसशास्त्राच्या साक्षेपी प्राध्यापिका डॉ.नन्दिनी दिवाण यांनी या पुस्तकात सुलभ मार्गदर्शन केले आहे. तसेच या संदर्भात सर्वांगीण व्यक्तिमत्त्व-विकासाबद्दलही काही सूचना दिल्या आहेत. शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिकण्याची वा शिकवण्याची आवड असणार्‍या सर्वांनाच हे पुस्तक मोलाचे ठरावे.


100.00 Read more

कस्तुरबा : शलाका तेजाची


[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !



195.00 Add to cart

संगोपन बाळ-गोपाळांचे

गर्भावस्थेपासून किशोरवयापर्यंतच्या मुलांचा आहार तसेच शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य यासाठी पालकांचा मार्गदर्शक


डॉ. सुभाष आर्य


डॉ. सुभाष आर्य हे भारतातील एक नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्यासंदर्भात त्यांना ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. किचकट, गुंतागुंतीच्या समस्या व त्यावरील उपाय सोप्या पध्दतीने समजविण्याची कलाही त्यांना अवगत आहे. त्यामुळे ज्ञान व अनुभवावर आधारित असलेली ही माहिती आपणास प्रत्यक्ष कृतीत आणता येईल. या पुस्तकात मातेचे गरोदरपण तसेच नवजात अर्भक ते किशोरवयापर्यंतच्या मुलांच्या संगोपनाविषयी सर्वांगीण माहिती आहे. मुलांच्या आहार व आरोग्याबाबत तसेच त्यांच्या संतुलित शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाबाबत मार्गदर्शन आहे. मुलांचे नेहमी उद्भवणारे आजार, त्यांच्या तक्रारी व समस्यांबाबत उपाययोजनाही आहे. सुदृढ व आनंदी मूल घडविण्यासाठी आत्मविश्वास देणारे हे पुस्तक पालकांसाठी मौल्यवान ठरावे.


100.00 Read more

मधुमेह आणि सुखी, समृध्द जीवन


डॉ. प्रदीप तळवलकर


मधुमेहाचा प्रादुर्भाव आजकाल समाजाच्या सर्व थरांमध्ये मोठया प्रमाणात आढळतो. एकेकाळी तापदायक व्याधी वाटणार्‍या मधुमेहाचा मुकाबला वास्तविक सर्वांनाच सहजपणे, अगदी हसतखेळत करता येईल. परंतु त्यासाठी हवी मधुमेहाविषयी परिपूर्ण माहिती. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेह-तज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी या पुस्तकात आवश्यक अशी माहिती पध्दतशीरपणे देऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. मधुमेहावर काबू मिळविण्यासाठी हे पुस्तक जणू गुरुकिल्लीच आहे. अत्याधुनिक संशोधन व प्रयोग यावर आधारित अद्ययावत माहितीचा साठा, पुस्तकाची सोपी रचना, सुलभ भाषा यामुळे हे पुस्तक मधुमेह्यांनाच नव्हे, तर त्यांच्या ‘फॅमिलीला’ आणि ‘फॅमिली डॉक्टरांनाही’ एक वरदानच वाटले.


175.00 Add to cart

उपयुक्त कला-छंद

विविध कला-छंद जोपासण्यासाठी व घर सुशोभित करणाऱ्या विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


प्रतिभा काळे


कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.


100.00 Add to cart

मायक्रोवेव्ह खासियत


उषा पुरोहित


आजच्या आघाडीच्या पाककृती लेखिका उषा पुरोहित यांची रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली ‘पाहुणचार’ व ‘सुगरणीचा सल्ला’ ही दोन्ही पुस्तके अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि अजूनही या पुस्तकांना मोठा प्रतिसाद लाभत आहे. आता आम्ही सादर करीत आहोत, आधुनिक युगाला आवश्यक असे त्यांचे नवे पुस्तक ‘मायक्रोवेव्ह खासियत’. मायक्रोवेव्ह या विशेष गुण अंगीभूत असलेल्या उपकरणाचा योग्य तो वापर करून जेवणातील सर्व प्रकारचे – पारंपरिक किंवा आधुनिक पदार्थ करता येतात. शिवाय वेळेची बचत, सोय, टापटीप, पदार्थाची चव, अन्नपदार्थांतील गुणधर्मांची जोपासना असे सर्व काही साध्य होते.
फक्त त्यासाठी हवी थोडी कल्पकता !
आणि कल्पकता हेच या पुस्तकाचे वैशिष्टये आहे. सूप्स, स्नॅक्स, भाज्या, डाळी, भात-पुलाव, नॉनव्हेज व गोड पदार्थ यांच्या विविध पाककृती यात आहेत. या पुस्तकामुळे आपणास खात्री पटते की ‘मायक्रोवेव्ह’ हे केवळ अन्न गरम करण्याचे साधन नव्हे, तर स्वादिष्ट पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकघराला बहुपयोगी असे वरदान आहे !


140.00 Add to cart

इम्प्रेसिव्ह इंग्लिश


बी.के. गर्दे


व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता

  • नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
  • नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांसाठी.
  • व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
  • परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
  • इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
  • चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
  • भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
  • कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.


170.00 Add to cart

क्रोशाचे विणकाम भाग – २

एका सुईवरील लोकरीचे नावीन्यपूर्ण विणकाम


[taxonomy_list name=”product_author” include=”709″]


योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपरी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.


100.00 Add to cart

आपली मंगळागौर

पूजा, खेळ, आरत्या


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!



75.00 Add to cart
1 37 38 39