25 | 978-81-86184-96-7 | Swayampakgharatil Vidnyan | स्वयंपाकघरातील विज्ञान | विविधांगी शास्त्रीय माहिती, मार्गदर्शन व अनेक उपयुक्त सूचना | Dr. Varsha Joshi | डॉ. वर्षा जोशी | स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा… विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात! धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते? प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते? विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात? आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील? विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल? डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत. आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक… स्वयंपाकघरातील विज्ञान! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 290 | 21.6 | 14 | 1.5 | 360 |
Kitchen Chemistry: Information about the science in cooking
|
Science | 250 | Swayampakgharatil Vidnyan.jpg | SwayakgharatilvidyanBC.jpg |
करामत धाग्या-दोऱ्यांशी
वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान
[taxonomy_list name=”product_author” include=”391″]
वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.
कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे.
ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतूहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारं पुस्तक…
करामत धाग्या-दोर्यांची!
Reviews
There are no reviews yet.